मुक्तपीठ टीम
मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी त्यांना अटक केली. दरम्यान, राऊत यांच्या विरोधात त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणीही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ!!
- संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- स्वप्ना यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये राऊत त्यांना धमकावतानाचे ऐकू येत आहे.
- पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहे.
- याच प्रकरणी ईडीने रविवारी राऊत यांच्या घरावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले होते.
- त्यानंतर राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांनी आपल्या भावाला बोगस केस प्रकरणी अटक केल्याचा दावा केला.
- तसेच भाजपाला त्यांची भीती वाटते, म्हणून त्यांना अटक करण्यात आली.
स्वप्ना यांची ऑडिओ क्लिप व्हायरल!!
- यापूर्वी संजय राऊत यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला होता.
- त्यात ते एका महिलेला मालमत्तेबाबत धमकावत होते.
- राऊत यांनी काही मालमत्ता आपल्या नावावर करून देण्याची धमकी देत जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप आहे.
- ही धमकी त्यांनी स्वप्ना पाटकर यांना दिल्याचे बोलले जात आहे.
- पाटकर पात्रा हे जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत.
- पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार वाकोला पोलिसांकडे केली होती.