मुक्तपीठ टीम
भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्याता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर मजूर नसतानाही मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे.
प्रवीण दरेकरांविरोधत गुन्हा दाखल!
- आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
- मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
- सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले.
- त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत.
- याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला.
- शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असं धनंजय शिंदे यांनी सांगितले.
धनंजय शिंदेंनी कोणते आरोप केले?
- धनंजय शिंदे यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ असल्याचा खोटा दावा करत मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत .
- मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते.
- २०१४-१५ ते २०१ ९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व सहकाऱ्यांनी मोठा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे, असा आरोप आहे.
- त्यामुळे कोणाताही ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.
हेही वाचा:
प्रवीण दरेकरांविरोधातील एफआयआरमध्ये काय म्हटलंय? एफआयआर जसा आहे तसा…
प्रवीण दरेकरांविरोधातील एफआयआरमध्ये काय म्हटलंय? एफआयआर जसा आहे तसा…
प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!
आप नेते धनंजय शिंदे यांच्याकडून समजून घ्या नेमकं काय घडलं…