मुक्तपीठ टीम
तीन नामांकित संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांनी एका विस्तृत अभ्यासानंतर दावा केला आहे की, मांसाहार करणार्यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कर्करोगाचा धोका १४ टक्के कमी असतो. शाकाहारी आहार हा रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित, वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड काबायोबँककडून माहिती घेण्यात आली होती. जे लोक मांस खातात त्यांना देखील वेगळ्या वर्गात ठेवण्यात आले होते. ११.४ वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांच्या खाण्याच्या सवयी पाहण्यात आल्या.
- पहिल्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून ५ किंवा अधिक दिवस मांसाहार करतात. लाल मांसाहारापासून कोंबडीपर्यंतच सर्व प्रकारचे मांस खातात.
- दुसऱ्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून पाच किंवा कमी दिवस मांसाहार करतात.
- मासे खाणाऱ्यांना तिसऱ्या गटात ठेवण्यात आले होते.
- चौथ्या आणि शेवटच्या वर्गात मांस आणि मासे न खाणाऱ्यांना ठेवण्यात आले होते.
डॉक्टर अयान बसू यांच्या मते, शाकाहारी आहारामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका २२ टक्क्यांनी कमी होतो. यामुळे कोणताही कर्करोग होण्याचा एकूण धोका १० ते १२ टक्क्यांनी कमी होतो. म्हणून शाकाहार आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
मांस न खाणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका २ % कमी
- नियमीत मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत अधूनमधून मांस खाणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका २% कमी झाल्याचे वैज्ञानिकांना आढळले.
- हा धोका फक्त मासे खाणाऱ्यांमध्ये १० टक्के तर शाकाहार करणाऱ्यांमध्ये १४ टक्के कमी असतो.
- कमी मांस खाणाऱ्यांमध्ये कोलन कॅन्सरचा धोकाही ९ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आलं आहे.
- शाकाहारी महिलांना रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका १८ टक्के कमी असल्याचे आढळून आले. ह्याचे कारण सामान्य वजन मानले जाऊ शकते.
- मांसाहार करणार्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका मासे खाणाऱ्यांमध्ये २० टक्के आणि शाकाहारी लोकांमध्ये ३१ टक्के कमी असल्याचे दिसून आले.