मुक्तपीठ टीम
नुकताच मुंबईमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिचा चित्रपट थप्पडला सर्वात जास्त ७ पुरस्कार मिळाले. तसेच बीगबी अमिताभ बच्चन यांच्या गुलाबो सिताबो या चित्रपटाला ६ पुरस्कार मिळाले आहे.
तसेच कर्करोग या दिर्घकालीन आजारांने निधन झालेल्या दिवंगत लोकप्रिय अभिनेता इरफान खानला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आाले आहे. हा पुरस्कार इरफान यांना त्यांच्या इंग्रजी मीडियम या चित्रपटासाठी मिळाला आहे. याव्यतिरिक्त त्यांना लाइफटाइम अॅचिव्हमेंट पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचा मुलगा बाबिल यांनी स्विकारला.
सर्व पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे
- सर्वोत्कृष्ट चित्रपट थप्पड
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ओम राऊत (तानाजी: द अनसंग वॉरियर)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – प्रतिक वत्स
- सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता इरफान खान (इंग्रजी माध्यम)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो चित्रपटासाठी)
- सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्री – तापसी पन्नू (थप्पड)
- सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता – सैफ अली खान (तानाजी: द अनसंग वॉरियर)
- सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट महिला- अभिनेत्री फारूक जाफर (गुलाबो सीताबो)
- सर्वोत्कृष्ट कथा – अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू (थप्पड)
- सर्वोत्कृष्ट पटकथा- रोहेना गेरा (सर)
- सर्वोत्कृष्ट संवाद – जुही चतुर्वेदी (गुलाबो सीताबो)
- सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक राजेश कृष्णन (लूटकेस)
- सर्वोत्कृष्ट डेब्यू महिला अभिनेत्री अलाया (जवानी जानेमन)
- सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- प्रीतम (लुडो)
- सर्वोत्कृष्ट गीतकार- गुलजार (छपाक)
- सर्वोत्कृष्ट पुरुष गायक – राघव चैतन्य (छपाक)
- सर्वोत्कृष्ट महिला गायिका – आशिष कौर (मलंग टायटल ट्रॅक)
- लाइफटाइम अॅचिव्हमेंट अवॉर्ड – इरफान खान
- सर्वोत्कृष्ट अॅक्शन रमजान बुलुट आणि आरपी यादव (तानाजी: द अनसंग वॉरियर)
- सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंट स्कोर – मंगेश उर्मिला (थप्पड)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अभिक मुखोपाध्याय (गुलाबो सीताबो)
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक – फराह खान (दिल बिचारे)
- सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइन – वीर कपूर (गुलाबो सीताबो)
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग – यश पुष्पा रामचंदानी (थप्पड)
- सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन – कामोद खराडे (थप्पड)