Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घोडबंदर मार्गावरील वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा भाग यंदाही पाण्याखाली जाण्याची भीती

June 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
mira bhayandar

मुक्तपीठ टीम

इको सेन्सेटिव्ह झोन असून देखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावा मुळे वरसावे नाका ते काजूपाडा दरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ह्या भागाची पाहणी केली. परंतु मीरा भाईंदर महापालिकेने मात्र ह्या पाहणी कडे पाठ फिरवत समस्ये बाबत गांभीर्य दाखवले नाही.

 

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात. हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन आहे. वरसावे येथील अनुहा लॉज जवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. येथून महामार्गाचे खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून महापालिकेने तर चक्क काँक्रीटचे बांधकाम करून टाकले आहे.

 

एक्स्प्रेस इन हॉटेल जवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुद्धा नावापुरताच उरला आहे. येथील सी एन रॉक हॉटेल परिसरात प्रचंड माती भराव झाला आहे. चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे. शिवाय परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत.

 

इको सेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भराव मुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात आहे. जेणे करून ह्या महार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प होते. तसेच चेणे गावात सुद्धा पूर येतो.

 

स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांनी ह्या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही. येथील अजय पाठक ह्यांनी तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश देऊन देखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.

 

घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मीरा भाईंदर महापालिकेस पत्र दिले होते. परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले, असे सूत्रांनी सांगितले.

 

त्या अनुषंगाने नुकतीच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील सह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिंदे, हिवरे, खिलारे यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील ह्यावर चर्चा झाली. ह्या पाहणी दौऱ्या नंतर आवश्यक कार्यवाहीचा अहवाल नुसार पुढील पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 


Tags: mira bhayanderMira Bhayander Municipal Corporationएम. जी. पाटीलघोडबंदर महामार्गमीरा भाईंदर महापालिकामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

“माझे रेशन, माझा अधिकार” अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे बार्टीचे आवाहन

Next Post
barti

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे बार्टीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!