Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, जानेवारीत येणार, फेब्रुवारीत उसळणार!

December 19, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
omicron

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन आता वेगाने पसरु लागला आहे. या नव्या व्हेरिंएटचा संसर्गाचा वेग जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले असतानाच भारतातही तो वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. आतापर्यंत देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिंएटचे १४५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय कोविड सुपरमॉडेल समितीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्यास आणि कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. समितीच्या  इशाऱ्यानुसार, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेत ती फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिखरावर जाण्याची भीती आहे.

 

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाची देशात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी ओमायक्रॉनच्या ३० नवीन  रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी शुक्रवारी २६ नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या तीन दिवसांपासून देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १४८ रुग्ण आढळले आहेत.

 

ओमायक्रॉनचा संसर्ग देशातील १२ राज्यात

  • देशात शनिवारी ओमायक्रॉनची ३० नवीन प्रकरणे नोंदवली गेल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
  • तेलंगणामध्ये १२, महाराष्ट्रात आठ, कर्नाटकात सहा आणि केरळमध्ये चार अशी नवीन ओमायक्रॉन प्रकरणे आढळून आली.
  • सर्व देशांनी आरोग्य सुविधा वाढवाव्यात डब्ल्यूएचओचा इशारा
  • सोमवारपासून चंदीगडमध्ये शाळा बंद
  • जानेवारीत भारतात तिसऱ्या लाटेची भीती

 

८९ देशांमध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जग सतर्क दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने असे सांगण्यात आले की, आरोग्य आणि सामाजिक उपायांनी ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येऊ शकतो. आपण ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी सर्व उपायांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दीड ते तीन दिवसांत त्याची प्रकरणे दुप्पट होतात. आतापर्यंत ८९ देशांमध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत.

 

चंदीगडमधील शाळा बंद, नवी मुंबईतही १६ विद्यार्थ्यांना बाधा

  • ओमायक्रॉनमुळे, चंदीगडमधील सर्व शाळा २० डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सर्व राज्ये ओमायक्रॉनबाबत सतर्क आहेत.
  • मुंबईतील एका शाळेत १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट, देशात पुन्हा लॉकडाऊन होणार का?

  • नॅशनल कोविड सुपरमॉडेल समितीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
  • फेब्रुवारीमध्ये ही लाट शिगेला पोहोचू शकते. मात्र, ती दुसऱ्या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही.

Tags: corona third waveCorona VirusgovernmentIndialockdownMaharashtramuktpeethOmicronomicron casesomicron infectionOmicron variantओमायक्रॉन संसर्गकोरोना तिसरी लाटकोरोना विषाणूदेशात लॉकडाऊनभारतमहाराष्ट्रमुक्तपीठसरकार
Previous Post

ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग! भारतात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट!

Next Post

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेत घोटाळ्याचा भाजपाचा आरोप, राज्यपाल सरकारला चौकशीचे आदेश देणार

Next Post
governor will order government to investigate alleged housing scam in bmc

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेत घोटाळ्याचा भाजपाचा आरोप, राज्यपाल सरकारला चौकशीचे आदेश देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!