मुक्तपीठ टीम
भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता व व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे. कोरोना संकट वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2020-21 या वर्षात दहा टक्के जास्त थेट गुंतवणूक झाली आहे.
🇮🇳 has attracted highest ever FDI inflow of US$ 81.7 bn during FY 2020-21, with a double digit growth of 10% over last year.
Govt led by PM @NarendraModi ji has taken measures for FDI reforms & ease of doing business, resulting in increased FDI inflows.https://t.co/8UOQbyO7Fa pic.twitter.com/VCPF6Uq2zf
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2021
जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांनी पहिली पसंती भारताला दिल्याचे खालील ठळक घडामोडींमुळे लक्षात येईल:
◆ 2020-21 या वर्षात भारतामध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक (FDI) करण्यात आली असून हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मधील 74.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.
◆ कंपनी भागभांडवलात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेली थेट परदेशी गुंतवणूक (FDI) (59.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स) ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे.(49.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स)
FDI inflows into India reached a record high at $ 81.72 billion during FY 2020-21, a period when the world was battling Coronavirus!
Modi government’s thrust on enhancing ease of doing business is yielding enormous dividends for the country.#IndiaFightsCorona pic.twitter.com/qBmXDpNawC
— BJP (@BJP4India) May 25, 2021
◆ आर्थिक वर्ष 2020-21 साठी या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर (29%), दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका (23%), आणि तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस (9%) आहे.
◆ आर्थिक वर्ष 2020-21मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असून भागभांडवलातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 44% गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13 % व त्यानंतर सेवाक्षेत्रात 8% इतकी गुंतवणूक झाली आहे.
◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीत गुजरातचा 78%, कर्नाटकचा 9% आणि दिल्लीचा 5% वाटा आहे.
◆ 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरात ला सर्वात जास्त म्हणजे 37%, त्याखालोखाल महाराष्ट्राला 27% व कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली.
The highest ever FDI inflow of $81.72 billion in the year 2020-21 is a testimony to the policy reforms, investment facilitation & ease of doing business measures that have been put in place by the govt. https://t.co/W6ebQzw0dR pic.twitter.com/UHB3NvwNGz
— FICCI (@ficci_india) May 25, 2021
◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गुजरातला प्राप्त झालेल्या भागभांडवलात सर्वाधिक वाटा (94%) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात असून बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 2% इतका वाटा होता.
◆ गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे.
◆ सर्वात मोठ्या 10 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे.
Measures taken by the government on the fronts of FDI policy reforms, investment facilitation & ease of doing business shows results. Even during a pandemic year, India managed to rank in the highest ever FDI during the financial year 2020-21. #TransformingIndia pic.twitter.com/GiphOMsj1j
— MyGovIndia (@mygovindia) May 25, 2021
◆ आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंड ने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
पाहा व्हिडीओ: