Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! पॅक खाद्यतेलात उत्पादकांकडूनच मोठ्या प्रमाणावर भेसळ!

एफडीएचे भेसळ करणाऱ्या गौतम अॅग्रो इंडिया, श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि आशीर्वाद ऑईल डेपोवर छापे

January 29, 2022
in घडलं-बिघडलं
0
FDA

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खाद्यतेल उत्पादकांविरोधात महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. हे खाद्यतेल उत्पादक हलक्या दर्जाच्या आणि आरोग्याला हानीकारक असलेल्या पामतेलाची महागड्या सूर्यफूल तेलात भेसळ करून ते पॅकबंद स्वरुपात विकत असत. स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एफडीएने मुंबई आणि परिसरातील  खाद्यतेलांच्या उत्पादकांवर छापे घातले. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वाशी येथील गौतम अॅग्रो इंडिया वर छापा घातला तर राज्य अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडी मधील श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि मीरारोडवरील आशीर्वाद ऑईल डेपोवर छापे घातले. दर्जा, गुणवत्ता आणि आरोग्यविषयक मापदंड पाळले जात आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी गेले काही आठवडे हे छापे घालण्यात आले. 

FDA raids at manufacturers adulterating refined sunflower oil

काही उत्पादकांच्या खाद्यतेलात भेसळ होत असून रिफाईंड सूर्यफूल तेलात हलक्या दर्जाच्या आणि आरोग्याला हानिकारक पाम तेलाची भेसळ होत असल्याच्या फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी या मुंबईस्थित ग्राहक कल्याण स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा छापा घालण्यात आला. ही विविध आकारातील भेसळयुक्त तेलाची पाकिटे पनवेल, अलिबाग, रायगड आणि राज्याच्या इतर भागांत तसेच मुंबईभर शुद्ध सूर्यफूल तेल म्हणून विकली जातात. जिथे तेल बनवले जाते ते कारखाने अस्वच्छ असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठाच धोका निर्माण होत आहे.

 

 

मंगळवारी, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वाशी येथील गौतम अॅग्रो इंडियाच्या कारखान्यावर छापा घातला. गौतम अॅग्रो गौतम तरल, सनटॉप, सनटाईम, गोल्डन डीलाईट, दिव्या आणि गॅलक्सीज फ्रेशलाईट या नावांखाली तेल बनविते आणि विक्री करते. वर नमूद केलेल्या नावाची तेल ही शुद्ध रिफाईंड सूर्यफूल तेल असल्याचा दावा केला जातो पण त्यांच्यामध्ये पाम तेलाची भेसळ असल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाने या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त केलेले असून भेसळीचे प्रमाण आणि घातक पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.

FDA raids at manufacturers adulterating refined sunflower oil

गेल्या आठवड्यात, राज्य अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडी मधील श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि मीरारोडवरील आशीर्वाद ऑईल डेपोवर छापे घातले. सूर्यफूलाच्या तेलात पाम तेलाची भेसळ करत असल्याचा त्यांच्यावर संशय होता. श्री गॅलक्सी एन्टरप्राईझेस गोल्डन डीलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, गॅलक्सीज फ्रेशलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सनलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, दिव्य रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन रिफाईंड सूर्यफूल तेल, सौराष्ट्र शेंगदाणा तेल, श्री राजवाडी शेंगदाणा तेल, गॅलक्सीज गजानन आणि रुद्राक्ष शेंगदाणा तेल या नावाने तेलाचे उत्पादन आणि विक्री करतात. तर मीरारोड वरील आशीर्वाद ऑईल डेपो सूर्य रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन गोल्ड रिफाईंड सूर्यफूल तेल आणि सन सिल्व्हर रिफाईंड सूर्यफूल तेल या नावांखाली तेलाचे उत्पादन आणि विक्री करतात. एफडीए विभागाने या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त केलेले असून भेसळीचे प्रमाण आणि घातक पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.

 

 

वाशी मध्ये करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल बोलताना महाराष्ट्राच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी कमलेश डी.केदारे म्हणाले, “काही उत्पादक खाद्यतेलांच्या भेसळीमध्ये गुंतल्याची माहिती आम्हांला आमच्या स्त्रोतांकडून मिळाली होती तसेच काही तक्रारीही आल्या होत्या. यामध्ये काही प्रमुख उत्पादकांची नावेही होती. त्यामुळे हा छापा घालण्यात आला. त्यांनी बनवलेले तेल पनवेल, अलिबाग, रायगड आणि राज्याच्या इतर भागांत तसेच मुंबईभर विकली जातात. अस्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक वातावरणात बनवलेले भेसळयुक्त अन्नपदार्थ विकून हे तेल उत्पादक लोकांच्या हिताला बाधा पोहोचवत आहेत. आम्ही वाशी येथे घातलेल्या छाप्याच्या जोडीलाच अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या दोन आठवड्यात भिवंडी आणि मिरारोड वरील तेल उत्पादकांवरही छापे घातले.”

 

 

फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी (एफडीसीडब्ल्यूसी)चे सचिव केथ डेव्हिड म्हणाले, “खाद्यतेलात भेसळ करण्याचा सर्रास प्रकार काही ज्ञात तेल उत्पादकांकडून केला जात आहे. हे ग्राहकांच्या हिताच्या विरुद्ध आहे. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यांतच ही समस्या मूळ धरू लागली आहे. संशयित उत्पादकांवर तातडीने कारवाईची पावले उचलल्याबद्दल आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाचे आभारी आहोत. या कारवाईमुळे तेलात भेसळ करणाऱ्या उत्पादकांना जरब बसेल. एफडीसीडब्ल्यूसी मध्ये आम्ही ग्राहकांच्या हितासाठी बांधील असून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची आणि सुरक्षीत उत्पादने मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष देतो.”

 

 

भारताच्या आघाडीच्या अन्न नियंत्रकांनी, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया किंवा FSSAI ने डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४,४६१ खाद्यतेल नमुन्यांपैकी २.४२% नमुने सुरक्षिततेच्या निकषांना धरून नव्हते तर २४.२% नमुने गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरले. यावरून बाजारपेठेत खाद्यतेलात भेसळीची शक्यता झाल्याचे सूचित होते.


Tags: FDASunFlower OilSuryaVashiनागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामहाराष्ट्र अन्नवाशी
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचीही मुंबई मनपा निवडणुकीची तयारी, मनपा अधिकाऱ्यांचे घाटकोपरमधील समस्यांकडे वेधलं लक्ष

Next Post

Switch Mobility Ltd. confirms Valladolid as site for new advanced manufacturing and technology centre

Next Post
SWITCH MOBILITY

Switch Mobility Ltd. confirms Valladolid as site for new advanced manufacturing and technology centre

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!