बाळकृष्ण मोरे
कल्याण डोंबिवली महापालिकेला पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर हे सदोष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या बाबत महापालिकेने या बाबतचा अहवालात पीएमओ कार्यालयाला पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या सदोष व्हेंटिलेटर मुळे किती कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात किती जणांनी आपला जीव गमावला हे अजून समोर यायचे आहे. देशभर व्हेंटिलेटर साठी पीएम केअर फंडातून दोन हजार करोड रुपये खर्च करण्यात आले होते. याच फंडातून भारतात तयार झालेले ५० हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येऊन ते भारतभर वितरित करण्यात आले होते.आता या देशभर पाठविण्यात आलेल्या सदोष व्हेंटिलेटर मुळे किती जन प्रभावित झाले हे चौकशी झाल्यास समोर येऊ शकते. त्यात आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मृत्यूदर वाढल्याने या बाबत चिंता देखील वाढली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना व या बरोबरच मृत्यूचा आकडा वाढत आहे.आता हा मृत्यूचा आकडा या सदोष व्हेंटिलेटर मुळे वाढत आहे का? असा प्रश्न समोर येत आहे. गेल्या आठवडा भरातील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची मृत्यूचा वाढता आकडा पहाता मागील लाटेत रोज सरासरी तीन ते चार कोरोना रुग्ण दगावत असताना आता हा आकडा रोज सरासरी दहाच्या वर पोचल्याचे दिसून येत या मुळे या बाबत शंका घेतली जात आहे. ८ मे ला एकाच दिवशी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १८ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.या बरोबर या सदोष व्हेंटिलेटर पूरवठा हा भारतात झाल्याने भारत भर या सदोष व्हेंटिलेटर किती बळी गेले ही बात अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार कल्याण डोंबिवली महापालिकेला ८० व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून पुरविण्यात आले होते. महापालिकेने उभारलेल्या सावळाराम क्रीडा संकुल, आर्ट गेलरी, जिमखाना, पाटीदार भवन येथे हे व्हेंटिलेटर बसविण्यात आले होते.यातील सावळाराम क्रीडा संकुल येथील सात व आर्ट गेलरी येथील आठ व्हेंटिलेटर खराब झाल्याने त्यांची इंजिनीअर कडून तपासणी करण्यात आली होती.
या नादुरुस्त व्हेंटिलेटरचे सेन्सर खराब झाल्याने सेन्सर बदलण्यात आले होते.या नंतर इंडिकेटर जरी १०० टक्के ऑक्सिजन दाखवण्यात येत असला तरी ऑक्सिजन लेव्हल ५३ ते ५५ पर्यंतच पुरवठा होत असल्याचे दिसून आले. या बाबत दुरुस्त करणाऱ्या इंजिनीअरने दिलेल्या अहवालात व्हेंटिलेटर निर्मितीच सदोष झाल्याने त्याची दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितल्याने आता पीएम केअर फंडातून पाठविण्यात आलेल्या सर्वच व्हेंटिलेटर बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे