मुक्तपीठ टीम
मागील वर्षी कोरोना साथीमुळे लॉकडाउन झाले. देशभरातील सर्व गाड्यांच्या फेऱ्या थांबविण्यात आल्या. यामुळे दिल्ली ते झांसी दरम्यान धावणारी गतिमान एक्स्प्रेसही बंद होती. आता, एक वर्षानंतर, १ एप्रिल २०२१ पासून गतिमान एक्स्प्रेस पुन्हा धावणार आहे. सध्या ३० जूनपर्यंत ती धावणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. शुक्रवारी तिची सेवा बंद राहील. या दिवशी रेल्वेची सफाई केली जाईल.
आग्रा, ग्वाल्हेर आणि झांसी ही देशातील प्रमुख पर्यटन स्थाने आहेत. या पर्यटन स्थळांना देशाची राजधानी, नवी दिल्लीशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेने गतिमान एक्स्प्रेस पुन्हा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कमी वेळात आणि चांगल्या सुविधांसह प्रवाशांना त्यांच्या स्थानी पोहोचवण्याचा या रेल्वेचा प्रयत्न असेल.
गतिमान एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन आहे. ही हजरत निजामुद्दीन ते आग्रा दरम्यान १६० किमी प्रतितास वेगाने जाते. रेल्वे रुळ मजबूत नसल्याने आग्रा ते झांसी दरम्यान १३० प्रतितास किमी वेगाने धावते. सध्या आग्रा ते झांसी दरम्यानचे रुळही मजबूत बनवले जात आहेत.
गतिमान एक्स्प्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून सकाळी ८.१० मिनिटांनी निघेल. अवघ्या दोन तासांत आग्रा येथे पोहोचेल. त्यानंतर ती आग्रा येथून सकाळी ९.५५ मिनिटांनी सुटेल आणि ग्वाल्हेरला सकाळी ११.७ वाजता पोहोचेल आणि झांसी येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. तर परतीची गाडी दुपारी ०३.०५ मिनिटांनी झांसीहून निघेल आणि ग्वाल्हेरला सायंकाळी ०४.०३ मिनिटांनी पोहोचेल, आग्रा येथून सायंकाळी ५.४० मिनिटांनी निघेल आणि हजरत निजामुद्दीनला ७.३० वाजता पोहोचेल.
पाहा व्हिडीओ: