दिल्लीच्या विविध सीमांवरील शेतकर्यांचे आंदोलन ४२ व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी होणऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करतील आणि तोडगा काढण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतील.
या संघटनांची आतापर्यंत सरकारसोबत आठ वेळा चर्चा झाल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी संघटनांच्या निम्म्या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत, तर तीनही कायदे मागे घेण्याची व किसान हमी दरावर शिक्कामोर्तब करण्यावर विरोध कायम आहे. या प्रकरणात सरकार आणि शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.
८ जानेवारी रोजी युनायटेड किसान आघाडी आणि सरकार यांच्यात पुन्हा बैठक होणार आहे. हे पाहता कृषीमंत्री तोमर यांनी यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहोत.
‘येत्या ७ जानेवारीला दिल्लीच्या चार सीमांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. हा मोर्चा २६ जानेवारीसाठीचा ट्रेलर असेल,’असा इशारा शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर २६ तारखेला हे आंदोलन चिघळण्याचा गंभीर इशारा केंद्र सरकारला या नेत्यांनी दिला आहे.