मुक्तपीठ टीम
राज्यसभेतील काही सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आज राज्यसभेत एकूण ७२ खासदारांचा निरोप संभारंभ पार पडला. महाराष्ट्रातीलही अनेक खासदार आज निवृत्त होत आहेत. या सर्वांच्या निरोप संभारंभाच्याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सभागृह नेते पियुष गोयल आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित आहेत. गुरुवारी सभागृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास नसल्याची घोषणा अध्यक्ष नायडू यांनी बुधवारी सभागृहात केली होती. निरोप समारंभात विविध पक्षांचे नेते आणि सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे. या निमित्ताने राज्यसभेतील कोणत्या खासदाराचा कालावधी कधी संपणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
जाणून घ्या कुणाकुणाचा कार्यकाळ संपणार…
एप्रिल
- एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे सभागृहातील उपनेते आनंद शर्मा, एके अँटनी, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी, एमसी मेरी कोम आणि स्वप्न दासगुप्ता यांचा समावेश आहे.
जून
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सुरेश प्रभू, एमजे अकबर, जयराम रमेश, विवेक तन्खा, व्ही. विजयसाई रेड्डी यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे.
जुलै
- जुलैमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये संजय राऊत,संभाजी छत्रपती, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, कपिल सिब्बल, सतीश चंद्र मिश्रा, प्रफुल्ल पटेल आणि केजे अल्फोन्स यांचा समावेश आहे.
कोण परतणार, कोण नाही?
- पियुष गोयल, निर्मला सीतारामन यांच्यासारखे काही केंद्रीय मंत्री आणि काही भाजपा नेत्यांना पुन्हा उमेदवारी मिळणे नक्की मानले जातं.
- शिवसेनेच्या संजय राऊतांचा राज्यसभा पुनरागमन हमखास होणार असल्याचं मानलं जातं.
- राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
- त्याचवेळी काँग्रेसच्या काही सदस्यांच्या फेरनियुक्तीबाबत स्थिती स्पष्ट नाही.यातील अनेक सदस्य असंतुष्ट गटांचा भाग आहेत ज्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे.
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा!
- राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या २५० इतकी असते.
- यापैकी २३८ सदस्यांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील विधिमंडळं करतात.
- तर १२ सदस्य राष्ट्रपती नियुक्त असतात.
- राष्ट्रपती विविध क्षेत्रातील १२ लोकांची निवड राज्यसभेवर सदस्य म्हणून करु शकतात.
- राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
- कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडून दिले जातात.
- राज्यसभेत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
- राज्यांच्या विधानसभेतील सदस्य राज्यसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करु शकतात.
#मुक्तपीठ LiVE राज्यसभेतून ७२ खासदारांची निवृत्ती…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांची भाषणं