मुक्तपीठ टीम
पुण्यातील प्रसिद्ध असलेले परांजपे बिल्डर यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांना मुंबई पोलिसांच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. एका वृद्ध महिलेच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा परांजपे बंधूंना पुण्याहून मुंबईला आणले.
७० वर्षीय वृद्ध महिलेची तक्रार
- या प्रकरणी मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
- तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली.
- खोटी कागदपत्र बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
- हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली.
- वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम ४७६, ४६७, ६८, ४०६, ४२० आणि १२० ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.