मुक्तपीठ टीम
देशात वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या युगात आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅनकार्ड नंबरही तुमच्या एटीएम पिनप्रमाणेच सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, ज्यात पॅनकार्ड, आधार कार्ड आणि आधारच्या ऑनलाईन वेबसाइटच्या मदतीने फसवणूकदाराने खऱ्या कार्डधारकचे नाव आणि मोबाईलनंबर पत्त्यासोबत बदलले आणि बँकेकडून लाखों रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले.
त्यामुळेच सामान्य लोकांनी आपले आधार कार्ड आणि पॅनकार्ड क्रमांक आपल्या एटीएम पिन प्रमाणे सामायिक करू नये. येत्या काही दिवसांत कर्जांच्या स्वीकृतीशी संबंधित फोन विविध बँकांच्या नावे येत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, फसवणूक करणारा बँकेच्या नावाने कॉल करतो आणि कर्ज मंजूर होण्याबद्दल लोकांना माहिती देतो आणि खाते, आधार कार्ड आणि पॅन नंबर विचारतो. मात्र, आपली माहिती फोनवर कोणालाच सांगितली नाही पाहिजे.
यावर स्टेट बँकेचे माजी अधिकारी वंशीधर प्रसाद यांनी सांगितले की, ऑनलाइन ऑफर कॉलवर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. बँकांव्यतिरिक्त, फसवणूक करणारेही याच प्रक्रिया वापरून सर्व माहिती एकत्रित करुन त्याचा गैरवापर करतात. तसेच मोबाईलवर येणाऱ्या मेसेजला प्रतिसाद ही देऊ नये. तसेच पुन्हा पुन्हा कॉल आला तर त्याची नोंद स्थानिक पोलिस स्टेशन किंवा सायबर सेलला करावी.
बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला माहिती नसताना एखाद्याच्या आयडीवर लाखो रुपयांचे कर्ज मिळाले तर ती रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर करून काढून घेतली जाते. मात्र, असे केल्याने त्या फसव्या व्यक्तीमुळे सिव्हिल रेकॉर्ड खराब होतो आणि कोणतीही बँक पुन्हा कर्ज देत नाही. मोबाईल अॅप्स आणि फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरचा वापर बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार करण्यासाठी केला जातो. त्यासाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड म्हणून सादर केलेल्या वित्तीय कंपन्या आणि खासगी बँकांमध्ये कर्ज देण्यासाठी बनावट क्लोन कार्डदेखील तयार केले जात आहेत. तसेच या कामात अनेक बँक कर्मचाऱ्यांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.