Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात पोलिसांमुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची गोची!

फडणवीस-दरेकर महाराष्ट्रात ज्या कंपनीसाठी लढले, त्याच कंपनीच्या संचालकाला गुजरातमध्ये अटक!

April 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
manish singh

मुक्तपीठ टीम

राज्यात रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. ज्या कंपनीच्या मालकासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले त्या कंपनीच्या संचालकांचा रेमडेसिविरच्या काळाबाजारात सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री त्याच कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात धावणे, आक्रमक विरोध करणे भाजपा नेत्यांना अडचणीचे ठरणार आहे.

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारप्रकरणी दमणस्थित औषध कंपनीच्या तांत्रिक संचालक मनीष सिंह आणि वलसाड जिल्ह्यातील त्याचा सहकारी वरुण कुंद्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील वलसाडचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजदीपसिंग झाला म्हणाले की, वरुण कुंद्राचे फर्निचरचे दुकान आहे. झटपट फायदा कमवण्यासाठी त्याने रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु केला. त्याला ब्रुक फार्माचा संचालक मनिष सिंह इंजेक्शन पुरवत असे. या दोघांना १५ एप्रिल रोजी वलसाडच्या वापीमधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनच्या १८ कुपी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

remdesivir (2)

ब्रुक फार्माच्या मालकाच्या चौकशीमुळे मुंबई पोलिसांवर भाजपाचे आरोप

  • शनिवारी रात्री मुंबई पोलिसांच्या चौकशीत ब्रूक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांनी माहिती दिली होती की त्यांच्या कंपनीकडून रेमडेसिविरची निर्यात केली जात होती. सध्या औषधाच्या निर्यातीवर बंदी आहे. त्यामुळे कंपनीकडे माल पडून आहे.
  • दरेकर हे काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत दमणमधील ब्रुक फार्माच्या कारखान्यात गेले होते.
  • त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतातच देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात पोहचले.
  • व्हायरल व्हिडीओप्रमाणे पोलिसांशी आक्रमकतेने वाद घालण्यात आला.
  • मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला चौकशीनंतर सोडले.
  • त्यावेळी त्याने पोलिसांना गुजरातमध्ये झालेल्या कारवाईची माहिती दिली नव्हती.
  • पोलिसांनी पकडलेला वरुण कुंद्रा हा रेमडेसिविर इंजेक्शन अत्यंत महाग दराने विकत होता आणि त्याच्याकडे विक्रीचा परवानाही नव्हता.
  • त्याला मुंबई पोलिसांनी चौकशी केलेल्या राजेश डोकानियांची ब्रुक फार्मा ही कंपनी रेमडेसिविर पुरवूच शकत नव्हती.

remdesivir (1)

गुजरात पोलिसांनी कसे उघड केले रेमडेसिवीरचे रॅकेट

  • वरुण कुंद्रा कोणत्याही परवान्याशिवाय रेमडेसिविर भरमसाठी किमतीने विकत असल्याची माहिती मिळताच वलसाड पोलिसांनी सापळा रचला.
  • एका रुग्णाचे नातेवाईक सांगून एक पोलीस कुंद्राला भेटला.
  • कुंद्रा १२ हजार रुपयांप्रमाणे रेमडेसिविरचे एक इंजेक्शन विकण्यास तयार झाला.
  • कुंद्राने इंजेक्शनची कुपी दाखवताच दुसऱ्या पोलिसाने त्याला पकडले.
  • आपला मित्र मनिष सिंहकडून रेमडेसिविर खरेदी केल्याचा दावा कुंद्राने केला.
  • त्यानंतर पोलिसांनी मनिष सिंहला अटक केली, त्याने तो ब्रुक फार्माचा साचालक असल्याचे सांगितले.

ब्रूक फार्माकडे रेमडेसिविर इंजेक्शन तयार आणि निर्यात करण्याचा परवाना आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच अत्यावश्यक वस्तू कायद्याव्यतिरिक्तही आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स अॅक्टच्या इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: प्रविण दरेकरमनीष सिंहरेमडेसिविरवरुण कुंद्राविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

पार्थ समथान लवकरच झळकणार आलिया भटसोबत!

Next Post

यकृत म्हणजे लिव्हर मजबूत तर कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी झटपट!

Next Post
liver

यकृत म्हणजे लिव्हर मजबूत तर कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी झटपट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!