मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून चांगलंच सुनावलं होतं. अपेक्षेप्रमाणेच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ठाकरेंच्या मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, या विधानावर फडणवीसांनी, जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग शिवसेनेतील सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल केला आहे. तसेच जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेले असाही प्रश्न त्यांनी ठाकरेंना विचारला आहे.
फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर…
- उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे.
- मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली.
- त्याला उगाच तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं.
- शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं.
- मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?
राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. - राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा.
- आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार.
- राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?
शिवसेनेला जनतेनं नाकारलं!
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल गरळ ओकताना पाहिलं.
- जनतेने भाजपाला नाकारलेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं.
शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. - आम्ही ७० टक्के जागा जिंकल्या. तुम्ही ४५ टक्के जागा जिंकल्या.
तुम्हाला जनतेने नाकारलं. - हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे.
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!
- मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही.
- कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का?
- जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का?
- जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही.
- जोपर्यंत भाजप जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही.
काय वाटेल ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!