मुक्तपीठ टीम
फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडियाच्या मालक कंपनीचे नाव बदलले आहे. इंस्ट्राग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक चालवणाऱ्या कंपनीचे नवे नाव ‘मेटा’ असणार आहे. कंपनीकडून गुरुवारी फेसबुक चालवणाऱ्या कंपनीच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली. १७ वर्षानंतर फेसबुकचे नाव बदलण्यात आले आहे. त्याची गेले काही दिवस चर्चा होती, आता अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.
सोशल मीडियाचा नवा ध्याय
- २००४ मध्ये फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी सुरु झाली.
- जगभरातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करणे, संवाद साधने यामुळे शक्य झाले.
- फेसबुक च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जग जवळ आल्याचे पाहायला मिळाले.
- मार्क झुकरबर्ग ज्यांच्या कल्पनेतून फेसबुकने जन्म घेतला, त्यांनी एका वाक्यात म्हटले आहे, “By giving people the power to share, we are making the world more transparent.”
- म्हणजेच जगाला अधिक पारदर्शी करण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे.
- अशा या प्रवासाचा आता नवा अध्याय सुरु होत आहे.
- मेटाव्हर्स हा सोशल कनेक्शनचा एक नवीन मार्ग असेल.
- हा एक सामूहिक प्रकल्प आहे जो जगभरातील लोक मिळुन यशस्वी करतील. हा प्रकल्प आधीप्रमाणेच सर्वांसाठी खुला असेल.
“I am proud to announce that, starting today, our company is now Meta.”
— CEO Mark Zuckerberg announces Facebook’s new name. pic.twitter.com/6YYaEKcufj
— The Recount (@therecount) October 28, 2021
‘मेटाव्हर्स’वर अधिक लक्ष
फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट्सच्या मालिकेत म्हटले आहे की, “आम्ही तयार केलेल्या इतर अॅप्स – इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप या अॅप्सची नाव तीच राहतील.” या नवीन ब्रँड अंतर्गत विविध अॅप्स आणि तंत्रज्ञान आणले जातील. कंपनी आपली कॉर्पोरेट संरचना बदलणार नाही. कंपनीच्या ऑगमेंटेड रियल्टी कॉन्फरन्सला संबोधित करताना, सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, “नवीन नाव मेटाव्हर्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल.”
मेटाव्हर्स शब्दाची जन्मकहाणी
- तीन दशकांपुर्वी डायस्टोपियन कादंबरीत ‘मेटाव्हर्स’ हा शब्द वापरण्यात आला होता.
- सध्या हा शब्द सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चेचा विषय आहे.
- डिजिटल जगात आभासी आणि परस्परसंवादी जागा स्पष्ट करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
- मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे.
- जिथे माणूस शारीरिकदृष्ट्या नसला तरीही उपस्थित राहू शकतो.
- यासाठी वर्चुअल रिअॅलिटीचा वापर केला जातो.