मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकीचा विविध एक्झिट पोल अर्थात जनमत चाचण्यांचे अंदाज गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते, याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवला गेला आहे. तरीही आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर एक्झिट पोलमधून जे अंदाज वर्तवले जातात तसेच घडले असे नसते. आजवर एक्झिट पोलचे अंदाज चुकीचेही ठरले आहेत. पण काहीवेळा ते कमालीचे बरोबर ठरले आहेत.
तामिळनाडू, पुद्दुचेरी या दोन राज्यांमध्ये सत्तांतराचा स्पष्ट अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम-केरळमध्ये सत्ताधारी सत्ता कायम राखतील असा अंदाज आहे. तरीही आसाममध्ये अटीतटीची लढत झाल्याने सर्वांचे लक्ष वेधलेले राहिल. सर्वात महत्वाच्या ठरलेल्या बंगालमध्ये कोणाची जादू चालेल, यावर मात्र संभ्रम कायम आहे. रिपब्लिक टीव्ही, इंडिया टीव्ही या दोन चॅनलनी तेथे भाजपाचा महाविजय दाखवला आहे. मात्र इतर तीन चॅलनी ममतांची जादू चालल्याचा अंदाजही व्यक्त झालाय. त्यामुले तिथे नेमकं काय घडले, ते रविवारी निकाल जाहीर होतील तेव्हाच स्पष्ट होईल.
संभ्रम कायम!
पश्चिम बंगाल
• सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील ३ एक्झिट पोलच्या निकालानुसार तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण काही एक्झिट पोलमध्ये बंगालमध्ये सत्ताबदल होऊन भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
• पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत २९४ विधानसभा जागांपैकी २९२ जागांवर मतदान झाले आहे.
• टाइम्स नाउ-सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १५८ जागा, भाजपाला ११५ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला १९ जागा मिळू शकतात.
• इंडिया टीव्ही-पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला ६४ ते ८८ जागा, भाजपाला १७३-१९२ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला ७ ते १२ जागा मिळू शकतात.
• रिपब्लिक-सीएनक्सच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १३३ जागा, भाजपाला १४३ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला १६ जागा मिळू शकतात.
• जन की बातच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला ११३ जागा, भाजपाला १७३ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळू शकतात.
• ईटीजी-रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६९ जागा, भाजपाला ११० जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला १२ जागा मिळू शकतात.
• पी-एमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १६२ जागा, भाजपाला ११३ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला १३ जागा मिळू शकतात.
• इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १३० ते १५६ जागा, भाजपाला १३४ ते १६० जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला २ जागा मिळू शकतात.
• टीव्ही ९- पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १४२ ते १५२ जागा, भाजपाला १२५ ते १३५ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला १६ ते २६ जागा मिळू शकतात.
• टुडे चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १८०+११ जागा, भाजपाला १०८+११ जागा आणि डावे-काँग्रेस आघाडीला ४+४ जागा मिळू शकतात.
सत्तांतराचा अंदाज
तामिळनाडू
• तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात सत्ता बदलाचे चित्र दिसत आहे.
• जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये द्रमुक-काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा अंदाज वर्तविला जात आहे.
• न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७५ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५७ जागा आणि इतर २ जागा मिळू शकतात.
• एबापी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १६०-१७२ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८-७० जागा आणि इतर ७ जागा मिळू शकतात.
• इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७५-१९५ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ३८-५४ जागा आणि इतर १-२ जागा मिळू शकतात.
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १५०-१७० जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८-६८ जागा आणि इतर ४ – ६ जागा मिळू शकतात.
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७२ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८ जागा आणि इतर ३ जागा मिळू शकतात.
पुद्दुचेरी
• पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि ८१.६४ टक्के मतदान झाले होते. पुद्दुचेरी विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा आघाडीचा विजय होणार असा अंदाज लावण्यात आला आहे.
• इंडिया टूडे-माय एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला २०-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा मिळू शकतात.
• एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १९-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा आणि इतर १-२ जागा मिळू शकतात.
• रिपब्लिक- सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १६-२० जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा मिळू शकतात.
• टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १७-१९ जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा मिळू शकतात.
जैसे थे राहणार असल्याचा अंदाज
केरळ
• केरळ विधानसभेचा एक्झिट पोलसमोर आला असून यात डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सत्तेत परतणार असा अंदाज लावण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सत्तावंचितच राहण्याची शक्यता आहे.
• न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला १०२ जागा, यूडीएफला ३५ जागा आणि भाजपाला ३ जागा मिळू शकतात.
• एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ७१-७७ जागा, यूडीएफला ६२-६८ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.
• इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला १०४-१२० जागा, यूडीएफला २०-३६ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ७२-८० जागा, यूडीएफला ५८-६४ जागा आणि भाजपाला १-५ जागा मिळू शकतात.
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ९१ जागा, यूडीएफला ४७ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.
आसाम
• भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये १२६ जागांवर निवडणूका पार पडल्या असून एक्झिट पोलनुसार भाजपा सत्ता टिकवून ठेवणार असल्याचा अंदाज आहे.
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७९ जागास काँग्रेसला ४५ जागा आणि इतर २ जागा मिळू शकतात.
• टाईम्स नाउ- सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ६५ जागा, काँग्रेसला ५९ जागा आणि इतर २ जागा मिळू शकतात.
• इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ८० जागा, काँग्रेसला ४५ जागा आणि इतर २ जागा मिळू शकतात.
• टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७० जागा, काँग्रेसला ५६ जागा आणि इतर २ जागा मिळू शकतात.
• जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७३ जागा, काँग्रेसला ५३ जागा मिळू शकतात.
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७३-७४ जागा, काँग्रेसला ५१-५२ जागा आणि इतर १-२ जागा मिळू शकतात.