Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन १८५७ ते १९४७ कालखंडातील दुर्मिळ छायाचित्रांचं अमरावतीत प्रदर्शन

August 11, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Exhibition of rare photographs of the Indian freedom struggle from 1857 to 1947 in Amravati

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय व शासकीय विभागीय ग्रंथालय, सहायक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन दिनांक १० ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत मोर्शी रोड वरील शासकीय विभागीय ग्रंथालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावती विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते १० ऑगस्ट, रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विभागीय ग्रंथालयातील सभागृहात करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघता येईल. हे प्रदर्शन संपूर्ण राज्यात नागपुर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई या शहरात १५ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

१७५७ ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, १८५७ लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे  छायाचित्र व मजकूर, राजाराममोहन  रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ ​अ‍ॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मैडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाल, अरविंद घोष, लाला लाजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना.

चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग आणि खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौराचौरी, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, स्वातंत्र्यदिन, संस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदि महत्वपूर्ण घटनांचे दुर्मिळ छायाचित्र व मजकुरांच्या माध्यमातून बघता येणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांविषयीची माहिती देणारे इंग्रजी, मराठी आणि हिंदी पुस्तके उपलब्ध आहे.

जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले आहे.

 

पाहा:


Tags: amravatiGood news MorningIndian freedom struggleRare Photosअमरावतीगुड न्यूज मॉर्निंगदुर्मिळ छायाचित्रभारतीय स्वातंत्र्य संग्राम
Previous Post

रेशीम उत्पादक महिलांची कल्पकता, रेशमी कोषापासून बनवल्या सुंदर राख्या!

Next Post

स्टार्ट-अप आणि एमएसएमईना सहा महिन्यांसाठी स्वदेशी 5G टेस्ट बेडचा मोफत वापर! कसं ते जाणून घ्या…

Next Post
Indigenious 5G Test Bed

स्टार्ट-अप आणि एमएसएमईना सहा महिन्यांसाठी स्वदेशी 5G टेस्ट बेडचा मोफत वापर! कसं ते जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!