Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी: १९८१ नंतर २०२२…अंतुलेंनंतर मुनगंटीवार! यावेळी प्रत्यक्षात येणार?

November 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Mungantiwar and Antulay

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवप्रेमींमध्ये महाराजांच्या तलवारींविषयी चर्चा सुरु झाली आहे. पण असं पहिल्यांदाच घडत नाही आहे. याआधी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदी असताना १९८०-८१च्या दरम्यान महाराजांची भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठीही प्रयत्न केले होते. त्यासाठी ब्रिटनच्या राणींशी भेटही ठरली होती. पण अंतुलेंचं पद गेलं आणि महाराजांच्या तलवारीचा विषयही मागे पडला. पुढे तर भवानी तलवार नेमकी कुठे, याविषयीही प्रश्न निर्माण झाला.

शिवाजी महारांजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार!!

  • भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.
  • त्यामुळं ‘जगदंबा तलवार’ पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
  • सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.
  • सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु,’ असे सांगितले आहे.
  • ते म्हणाले की, ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत. ज्यांचा भारताशी संबंध आहे. मी क्रेंद्र सरकारला विनंती केली आहे. तसंच, मी सुनक यांनाही पत्रव्यवहार करणार आहे.

ए. आर. अंतुलेंनीही केले होते तलवारीसाठी प्रयत्न…

  • १९८०मध्ये सध्याचा रायगड आणि तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यातून निवडून आलेले अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम असणाऱ्या अंतुलेंनी कुलाब्याचं नाव बदलून रायगड केलं. त्यांनी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमध्ये असल्याचे कळताच ती परत आणण्यासाठीही प्रयत्न केले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी अंतुलेंनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणी सुरू केली होती. त्यांची राणींशी बैठकही ठरली होती. पण, तलवार परत आणण्याची चर्चा होण्यापूर्वीच घात झाला. बॅरिस्टर अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांची निवड झाली. पण त्यांनी ब्रिटनच्या राणीशी चर्चा करण्यासाठी पुढची पाववलं उचललीच नाहीत.
  • त्यावेळी बॅरिस्टर अंतुलेंनी मुख्यमंत्री म्हणून ब्रिटनच्या राणीशी चर्चा केली असती, तर तलवारींचं नेमकं वास्तव समोर आलं असतं. त्या भारतात आणण्यासाठी काही तरी प्रक्रिया झाली असती. कदाचित आतापर्यंत त्या तलवारींपैकी एक तरी तलवार भारतात परत आली असती!

…भवानी तलवार आहे कुठे?

  • अंतुलेंनी त्या काळात महाराजांच्या तलवारींसाठी प्रयत्न केले असले तरी त्यावेळी चर्चेत असणारी भवानी तलवार ब्रिटनमध्ये नाहीच, असंही पुढे उघड झालं.
  • राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड हे १८७५मध्ये भारत भेटीवर आले होते. तेव्हा कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना तुळजा आणि जगदंबा तलवारी भेट दिल्या होत्या. त्या तलवारीच त्या देशात असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकीच जगदंबा तलवार परत आणण्याची घोषणा आता सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी केली आहे.

Tags: A. R. AntulayChhatrapati Shivaji MaharajJagdamba Talwarsudhir mungantiwarअब्दुल रहमान अंतुलेछत्रपती शिवाजी महाराजजगदंबा तलवारब्रिटनभवानी तलवारसुधीर मुनगंटीवार
Previous Post

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे  

Next Post

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post
uday samant

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट - उद्योगमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!