मुक्तपीठ टीम
कोरोना संकटामुळे सारेच जनजीवन थंडावले होते. सर्व क्रीडा उपक्रमांनाही त्याचा फटका बसला. मात्र, ज्यांच्या मनात खेळ जागे होते ते कसे स्वस्थ बसणार? पुण्यातील अशाच तरुणांनी एव्हरेस्टिंग नावाचा एक नवा उपक्रम लोकप्रिय करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना चांगला प्रतिसादही लाभत आहे.
एव्हरेस्टिंगचं आव्हान म्हणजे काय?
एव्हरेस्टिंग म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टएवढी उंची चढणे किंवा उतरणे. एव्हरेस्टची उंची ८ हजार ८४८ मीटर आहे. तेवढे अंतर एका प्रयत्नात गाठायचे. एव्हरेस्टिंग आव्हान तुम्ही पायी किंवा सायकलने पार करु शकता.
एव्हरेस्टिंगमध्ये मॅरेथॉनप्रमाणे काही वेगळे प्रकार आहेत. हाल्फ एव्हरेस्टिंग म्हणजे ४ हजार ४२४ मीटर आणखी एक आणखी एक दहा हजार मीटर पार करणाऱ्यांचा. एव्हरेस्टिंग करताना झोप घेता येत नाही. काही वेळ थांबून विश्रांती मात्र घेता येते. अनुभवी सायकलपटूंना पूर्ण एव्हरेस्टिंगसाठी ३० तास लागू शकतात. अर्थात प्रत्येकाच्या क्षमतेवर वेळ अवलंबून असते.
पुण्यातील चैतन्य वेल्हाळ यांनी एव्हरेस्टिंगचे आव्हान लोकप्रिय केले आहे. पुणे परिसरात अनेक घाट आहेत. अवघड रस्ते आहेत. अनेक पुणेकर घाटरस्त्यांवर सायकलिंगची मजा लुटत असतात. त्यामुळे त्यांना हे नवं आव्हान नवी मजा देणारे वाटते. अर्थात ते सोप नसले, तरीही एकदा स्वीकारलं, पूर्ण केलं की त्याची गोडी लागते ती कायमचीच!
पाहा व्हिडीओ: