मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. राज्य सेवा परीक्षा २०२१- जाहिरात ऑक्टोबर २०२१, पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२(निकाल मार्च २०२२), मुख्य परीक्षा ७, ८ व ९ मे २०२२(निकाल ऑगस्ट २०२२). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१- जाहिरात डिसेंबर २०२१, पूर्व परीक्षा १२ मार्च २०२२(निकाल मे २०२२), मुख्य परीक्षा २ जुलै २०२२(निकाल ऑगस्ट २०२२).
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ – जाहिरात ऑक्टोबर २०२१, पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२(निकाल एप्रिल २०२२), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ -संयुक्त पेपर क्रमांक 1 मुख्य परीक्षा ९ जुलै २०२२ (निकाल सप्टेंबर २०२२), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ -पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा १७ जुलै २०२२ (निकाल सप्टेंबर २०२२), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१- पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २४ जुलै २०२२ (निकाल सप्टेंबर २०२२), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ३१ जुलै २०२२(निकाल सप्टेंबर २०२२).
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१- जाहिरात डिसेंबर २०२१, पूर्व परीक्षा ३ एप्रिल २०२२ (निकाल मे २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१- संयुक्त पेपर क्रमांक १ – मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट २०२२(निकाल ऑक्टोबर २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१- पेपर क्रमांक २ लिपिक टंकलेखक – मुख्य परीक्षा १३ ऑगस्ट २०२२(निकाल ऑक्टोबर २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१- पेपर क्रमांक २ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क – मुख्य परीक्षा २० ऑगस्ट २०२२ (निकाल ऑक्टोबर २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021- पेपर क्रमांक २ कर सहायक – मुख्य परीक्षा २७ ऑगस्ट २०२२ (निकाल ऑक्टोबर २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१- पेपर क्रमांक २ तांत्रिक सहायक – मुख्य परीक्षा १० सप्टेंबर २०२२ (निकाल ऑक्टोबर २०२२), महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१- पेपर क्रमांक २ उद्योग निरीक्षक – मुख्य परीक्षा १७ सप्टेंबर २०२२(निकाल ऑक्टोबर २०२२).
महाराष्ट्रट राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१- जाहिरात डिसेंबर २०२१, पूर्व परीक्षा २० एप्रिल २०२२(निकाल जून २०२२), महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२१- मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर २०२२ (निकाल नोव्हेंबर २०२२), महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ व महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा २०२१- मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२२(निकाल नोव्हेंबर २०२२), महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१- मुख्य परीक्षा २९ ऑक्टोबर २०२२(निकाल नोव्हेंबर २०२२).
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१- जाहिरात डिसेंबर २०२१, पूर्व परीक्षा १६ एप्रिल २०२२(निकाल मे २०२२), मुख्य परीक्षा ३ जुलै २०२२(निकाल सप्टेंबर २०२२). सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१- जाहिरात डिसेंबर २०२१, पूर्व परीक्षा ६ मार्च २०२२ (निकाल एप्रिल २०२२). राज्यसेवा परीक्षा २०२२- जाहिरात एप्रिल २०२२, पूर्व परीक्षा १९ जून २०२२(निकाल ऑगस्ट २०२२), मुख्य परीक्षा १५, १६ व १७ ऑक्टोबर २०२२(निकाल जानेवारी २०२३). दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२- जाहिरात मार्च २०२२, पूर्व परीक्षा ७ ऑगस्ट २०२२(निकाल सप्टेंबर २०२२), मुख्य परीक्षा २० नोव्हेंबर २०२२(निकाल जानेवारी २०२३).
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२- जाहिरात जून २०२२, पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२(निकाल नोव्हेंबर २०२२). महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२-संयुक्त पेपर क्रमांक १ – मुख्य परीक्षा २४ डिसेंबर २०२२(निकाल फेब्रुवारी २०२३). महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२- पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक – मुख्य परीक्षा ३१ डिसेंबर २०२२(निकाल फेब्रुवारी २०२३). महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२- पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक – मुख्य परीक्षा ७ जानेवारी २०२३(निकाल फेब्रुवारी २०२३). महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२- पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी – मुख्य परीक्षा १४ जानेवारी २०२३(निकाल फेब्रुवारी २०२३).
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२- जाहिरात जून २०२२, पूर्व परीक्षा ५ नोव्हेंबर २०२२(निकाल डिसेंबर २०२२). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२- संयुक्त पेपर क्रमांक १ – मुख्य परीक्षा ४ फेब्रुवारी २०२३(निकाल एप्रिल २०२३). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२-पेपर क्रमांक २ लिपिक टंकलेखक – मुख्य परीक्षा ११ फेब्रुवारी २०२३(निकाल एप्रिल २०२३). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२-पेपर क्रमांक २ तांत्रिक सहायक – मुख्य परीक्षा १८ फेब्रुवारी २०२३(निकाल एप्रिल २०२३). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२-पेपर क्रमांक २ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – मुख्य परीक्षा २५ फेब्रुवारी २०२३(निकाल एप्रिल २०२३). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२-पेपर क्रमांक २ कर सहायक – मुख्य परीक्षा ४ मार्च २०२३(निकाल एप्रिल २०२३). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२-पेपर क्रमांक २ उद्योग निरीक्षक – मुख्य परीक्षा ११ मार्च २०२३(निकाल एप्रिल २०२३).
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२- जाहिरात जुलै २०२२, पूर्व परीक्षा २६ नोव्हेंबर २०२२(निकाल जानेवारी २०२३). महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा १८ मार्च २०२३(निकाल मे २०२३). महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा २५ मार्च २०२३(निकाल मे २०२३). महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा २ एप्रिल २०२३(निकाल मे २०२३). महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा ९ एप्रिल २०२२(निकाल मे २०२३). महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा १६ एप्रिल २०२३(निकाल जून २०२३). महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२- मुख्य परीक्षा २३ एप्रिल २०२३(निकाल जून २०२३).
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२- जाहिरात जून २०२२, पूर्व परीक्षा १०डिसेंबर २०२२(निकाल जानेवारी २०२२), मुख्य परीक्षा ३०एप्रिल २०२३(निकाल जून २०२३).