- महामारीदरम्यानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादन श्रेणी
- प्रतिनिधींना ग्राहकांच्या संपर्कात राहाण्यासाठी मदत करणारी कार्यक्षम डिजिटल साधने
- नव्या व्यावसायिक वातावरणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम
कोव्हिड- 19 ने सर्वच उद्योगांच्या व्यावसायिक वातावरणात लक्षणीय बदल घडवले असून त्यात जीवन विमा उद्योगाचाही समावेश आहे. नव्या वातावरणात लॉकडाउनच्या नियमांमुळे वैयक्तिक भेटींचे प्रमाण अतिशय कमी किंवा नगण्य झाले असून या महामारीचा विमा प्रतिनिधींच्या कामावरही मोठा परिणाम झाल्याचे लक्षात येईल. प्रतिनिधींना स्थिर उत्पन्न मिळावे आणि महामारीच्या काळातही त्यांना ग्राहकांच्या संपर्कात राहाता यावे यासाठी बजाज अलियान्झ लाइफ या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एका कंपनीने काही पावले उचलली होती. त्यामधे ग्राहकांच्या गरजा पुरवणारी उत्पादने, प्रतिनिधींना कार्यक्षमपणे काम करता यावे यासाठी मदत करणारी डिजिटल साधने, प्रतिनिधींना त्यांच्या व्यवसायात प्रगती करण्यासा मदत करणारी प्रशिक्षण सत्रे यांचा त्यात समावेश होता. कंपनीने अतिशय वेगाने डिजिटल साधनांचा अवलंब करत ग्राहकांचा जीवनध्येयांच्या दिशेने प्रवास सुरळीत राहील यासाठी आपली यंत्रणा आणखी मजबूत केली.
बजाज अलियान्झ लाइफचे प्रमुख एजन्सी अधिकारी समीर जोशी म्हणाले, ‘या महामारीमधे वेग, निश्चय, व्यवसाय तसेच जीवन विमा प्रतिनिधींसाठी प्रतिसादात्मक राहाणे अशा सर्वच गोष्टींची परीक्षा झाली. आम्ही गेल्या 9- 10 महिन्यांमधे सातत्याने तत्पर राहात आमच्या प्रतिनिधींबरोबरचे नाते आणखी मजबूत केले. ग्राहकांपुढे आमचे प्रतिनिधीत्व करणारे ते सर्वात मोठे घटक असून या अनपेक्षित काळात त्यांनी केलेले काम व मेहनतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्यांना ग्राहकांच्या संपर्कात राहाण्यासाठी, ग्राहकांना योग्य उत्पादने निवडण्यास मदत करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्य त्या प्रत्येक मार्गाचा वापर करून काम करत राहून नव्या व्यावसायिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी सज्ज राहाण्यास आवश्यक मदत केली. मला खात्री आहे, की या अवघड काळात काही टप्पे यशस्वीपणे पार करत बजाज अलियान्झ लाइफ पुढे जात असतानाच आमच्या टीम्स, प्रतिनिधी यांची काळजी घेतली जाईल व त्यांना त्यांची जीवन आणि व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत केली जाईल.’
बजाज अलियान्झ लाइफच्या व्यवसायाची अद्यावत माहिती (डिसेंबर 2020 पर्यंत)
महामारीने देशाला ग्रासले तेव्हा खासगी जीवन विमा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली व त्यांना घरून काम करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली. त्याचप्रमाणे कंपनीने तंत्रज्ञान भक्कम करत ग्राहक, प्रतिनिधी व भागिदारांसाठी कित्येक नाविन्यपूर्ण डिजिटल साधने उपलब्ध केली. या शिस्तबद्ध नियोजनामुळे कंपनीला ग्राहकांना त्यांच्या गरजेच्या वेळेस, त्यांना हव्या त्या पद्धतीने उत्पादने उपलब्ध करणे, अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचे पुनर्नूतनीकरणे करणे शक्य झाले.
या कठीण काळात ग्राहकांच्या तसेच प्रतिनिधी व विक्री कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर कंपनीचा भर दिला असून त्यामुळे डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मधे कंपनीच्या रिटेल न्यू बिझनेस 41 टक्क्यांची वाढ होऊन ती या काळात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी जीवन विमा कंपनी ठरली. कंपनीच्या विमा योजनांमधेही 36 टक्क्यांची वाढ झाली असून ही वाढ 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीतील या क्षेत्रातील सर्वाधिक वाढ ठरली आहे.
महाराष्ट्रामधे बजाज अलियान्झ लाइफ सकारात्मक प्रगती दर्शवत आहे.
बजाज अलियान्झ लाइफ एजन्सी व्यवसाय
देशभरातील ग्रहकांच्या संपर्कात राहाणारे विमा प्रतिनिधी हे कोणत्याही विमा कंपनीचे बलस्थान असतात. ग्राहक रिन्यूवल्सचे पैसे भरण्यासाठी, आर्थिक सल्लासेवा घेण्यासाठी, जीवन ध्येयांविषयी सल्ला घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवन विमा खरेदी करण्यासाठी त्यांची भेट घेतात. मात्र, या महामारीत सगळंच चित्र बदललं. बजाज अलियान्झ लाइफने बदलत्या व्यावसायिक वातावरणाची, डिजिटल ग्राहकाची दिशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रतिनिधींच्या गरजा ओळखून त्यानुसार प्रतिनिधींना ग्राहकांच्या संपर्कात राहाण्यासाठी व आपले उत्पन्न कायम ठेवण्यासाठी मदत होईल यासाठी विविध सेवा उपलब्ध केल्या.
कंपनीचे देशभरात एक लाख प्रतिनिधी असून त्यांनी 99,000 पेक्षा जास्त विमा योजना आणि 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 3333 कोटी रुपये एकूण रिटन प्रीमियम गोळा केला आहे. बजाज अलियान्झ लाइफच्या एजन्सी चॅनेलचा डिसेंबर 2020 मधे 23 टक्के वाढीसह सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या चॅनेल्समधे समावेश होता. डिसेंबर 2020 मधे त्यात 3000 प्रतिनिधींचा समावेश झाला.
बजाज अलियान्झने आपल्या प्रतिनिधींसाठी तयार केलेले उपक्रम
१) दमदार उत्पादन श्रेणी – देशभरात कोव्हिड- 19 चा उद्रेक झाल्यानंतर ग्राहकांमधेही जोखमीविषयीची जागरूकता तसेच टर्म योजनांची गरज वाढली. त्याशिवाय ग्राहक भविष्यातही उत्पन्न मिळत राहावे यासाठी खात्रीशीर परतावे देणारी उत्पादने शोधायला लागले. अखेर, भारतीय बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली, तशी ग्राहकांमधे बाजारपेठेमधे गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक साधनाची गरज भासायला लागली.
कंपनीने आपली बजाज अलियान्झ लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट गोल, बजाज अलियान्झ लाइफ गॅरंटीड इन्कम गोल आणि बजाज अलियान्झ लाइफ फ्लेक्सी इन्कम गोल्स अशी विमा उत्पादने खरेदी करण्यास व समजून घेण्यास सोपी राहातील याची काळजी घेतली.
२) डिजिटल साधने – नव्या व्यावसायिक वातावरणात ग्राहक तसेच व्यवसाय पैसे भरण्यासाठी किंवा उत्पादनांसाठी सेवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे वैयक्तिक भेटी कमी झाल्या असून ग्राहक घरी राहाणे पसंत करत आहेत. बजाज अलियान्झ लाइफने बरीच डिजिटल साधने विशेषतः आपल्या प्रतिनिधींसाठी लाँच केली असून त्यांना माहिती व ज्ञानासह सक्षम केले आहे. या साधनांमुळे ई- मीटिंग्ज सोप्या होतात व प्रतिनिधींना ग्राहकांना उत्पादन समजावून सांगणे सोपे होते तसेच त्यांना आपला व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत होते. त्यापैकी काही साधने पुढे नमूद केली आहेत. ही साधने प्रतिनिधींना त्यांच्या मोबाइल फोनवर उपलब्ध असून केवळ एका क्लिकच्या मदतीने वापरता येतात.
स्मार्ट असिस्ट – वैयक्तिक भेटीऐवजी व्हर्च्युअल भेटण्यासाठी मदत करणारे साधन (बिना मिले मिलकर)
क्विक कोट – संभाव्य ग्राहकांबरोबर केवळ 30 सेकंदांत कोटेशन तयार करून व्हॉट्स अपवर शेयर करा.
इन्स्टालर्न – सर्टिफिकेशनसह डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म
आयस्मार्ट – आयसीच्या सर्व गरजांसाठी सेल्फ सर्व्हिस अप्लिकेशन
ईसंपर्क – डिजिटल प्लॅटफॉर्मसच्या माध्यमातून विपणन साहित्य पर्सनलाइज करून शेयर करण्यासाठी मदत करणारे साधन
३) सातत्यपूर्ण प्रशिक्षण: बजाज अलियान्झ लाइफने देशभरातील आपल्या प्रतिनिधींना बदलत्या व्यावसायिक वातावरणात मदत करण्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण यंत्रणा सुरू केली. डिजिटल वातावरणात ग्राहकांना कसा संपर्क साधायचा (उदा. व्हिडिओ कॉल कसा करावा) इथपासून त्यांना ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीपर्यंत, जीवन विमाविषयक समतोल सल्ला देण्यापासून किंवा ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी नव्या युगातल्या डिजिटल साधनांचा वापर करण्यापर्यंत कंपनीने त्यांचे प्रतिनिधी माहीतदार असतील याची खात्री केली. यामुळे 2019 च्या तुलनेत 2020 मधे इन्स्टालर्नवरील युजर्सची संख्या जवळपास दुपटीने वाढली आणि त्यावर घालवण्यात आलेला वेळ (तास) 2019 च्या तुलनेत 2020 मधे तीन पटींनी वाढला.
महामारीच्या काळात प्रतिनिधींसाठी शाश्वत उत्पन्न
बजाज अलियान्झ लाइफच्या पॅन भारताभरातील प्रतिनिधींनी 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या वर्षात आपल्या मिळकतीमधे 10.7 टक्के वाढ नोंदवली. पॅन भारतातील एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या प्रतिनिधींची संख्या 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या वर्षात 17.6 टक्क्यांनी वाढली. त्याशिवाय 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या वर्षात 64,500 प्रतिनिधींना उत्पन्न मिळाले. ही संख्या गेल्या वर्षी 58,000 होती.
31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या वर्षात महाराष्ट्रातील प्रतिनिधींचे उत्पन्न 15,.6 टक्क्यांनी वाढले. एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या प्रतिनिधींची संख्या 24.1 टक्क्यांनी वाढली, तर एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्यांची संखअया 15.0 टक्क्यांनी वाढली. नऊ महिन्यांसाठीची मिळकत.
उत्पादनांच्या अटी व शर्ती, जोखमीचे घटक, वगळला जाणारा भाग यांविषयी आणि कंपनीच्या विमा उत्पादन श्रेणीविषयक अधिक माहितीसाठी
संकेतस्थळाला भेट द्या https://www.bajajallianzlife.com/