मुक्तपीठ टीम
कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयने २०२२ च्या अखेरीस देशभरात आरोग्य विमा योजना ईएसआयने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा योजना ४४३ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: आणि १५३ जिल्ह्यांमध्ये अंशतः लागू आहे. एकूण १४८ जिल्हे सध्या कर्मचारी राज्य विमा योजनेच्या कक्षेत नाहीत.
कर्मचारी राज्य विमा योजना होणार अनिवार्य होणार
- कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मचारी राज्य विमा योजनेच्या १८८व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- बैठकीत कर्मचारी राज्य विमा योजना या वर्षाच्या अखेरीस देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस अंशतः कर्मचारी राज्य विमा योजनेत समाविष्ट असलेले आणि त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील.
या राज्यांमध्ये रुग्णालये सुरू होणार
- नवीन दवाखान्यांसह शाखा कार्यालये स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.
- याशिवाय कर्मचारी राज्य विमा मंडळाने देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यापैकी महाराष्ट्रात सहा, हरियाणामध्ये चार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत.
- आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाईल.
- याशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत.
- ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करतील.