मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात जे धडधाकट आहेत त्यांनाही कोरोना प्राणघातक ठरतो. पण कल्याण डोंबिवलीच्या कोरोना सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमनं एका एपिलेप्सीग्रस्त तरुणीला कोरोनाच्या दाढेतून खेचून बाहेर आणलं. या तरुणीला एपिलेप्सीचा त्रास होता एवढंच नाही तर तिची कोरोनाची स्थितीही अत्यवस्थ म्हणावी अशीच होती. तिचा एचआर सीटी स्कोअर २५/२५ असल्याने अनेकांनी आशाच सोडली होती. मात्र, कल्याण-डोंबिवली मनपाच्या पी.सावळराम म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोरोना रुग्णालय चालवणारे डॉ. राहुल घुले आणि त्यांच्या टीमने त्या तरुणीची केस एक आव्हान म्हणून स्वीकारली. एपिलेप्सीग्रस्त असल्याने ती तरुणी वयाने मोठी असूनही तिची अवस्था लहान मुलांसारखीच होती. विशेष प्रतिसाद नाही. तिला काय होतं, ते सांगता येत नव्हतं. त्यामुळे केवळ वैद्यकीय तपासणी आणि लक्षणांच्या आधारे वन रुपी क्लिनिकच्या टीमने तिच्यावर उपचार केले. अखेर ती तरुणी कोरोनामुक्त झाली.
हेही वाचा: समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…
स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. त्यांना एपिलेप्सीग्रस्त रुग्णावर उपचार करणे किती अवघड ते ठाऊक असल्याने त्यांनी कोरोना सेंटरमधील टीमचे खास कौतुक केले. त्यांनी केलेलं ट्विट बोलकं आहे… “@DrRahulGhule11 आणि त्यांची टिम ठरतेय देवदूत…
कोरोना संसर्गामुळे इन्फेक्शन #HrCTScore २५/२५, तरीही एपिलेप्सीग्रस्त तरूणी झाली पूर्णपणे कोरोनामुक्त”
अक्षरश: मरणाच्या दाढेतून रुग्णाला परत आणणारे कल्याण-डोंबिवली मनपाच्या पी.सावळराम म्हात्रे क्रिडा संकुल येथील कोविड रुग्णालयाचे @DrRahulGhule11 आणि त्यांची टिम ठरतेय देवदूत…
कोरोना संसर्गामुळे इन्फेक्शन #HrCTScore २५/२५, तरीही एपिलेप्सीग्रस्त तरूणी झाली पूर्णपणे कोरोनामुक्त pic.twitter.com/yHKztGF35q
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) May 15, 2021
कोरोना संकटाच्या या दुसऱ्या लाटेत सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत आहे. त्याचवेळी डॉ. राहुल घुले मात्र आपल्या वन रुपी क्लिनिक कंपनीच्या माध्यमातून समर्पित डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिकांच्या टीमच्या माध्यमातून रुग्णसेवेचा मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या दुव्याबरोबरच राजकीय नेत्यांकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ: