महाराष्ट्र म्हटलं की आपला श्वास, आपला ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच! त्यांचे गड – किल्ले म्हणजे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनमोल ठेवा. त्यामुळेच ते प्रेरणादायी वैभव जपण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांचा ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत असते. तळमळीनं प्रसंगी स्वत:च्या खिशातून खर्च करत ही तरुणाईनं सळसळणारी संस्था गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन यासाठी सतत – अविरत – अथक प्रयत्नरत असते.