*मनोरंजन महत्त्वाचे*: १) तरूण वर्गाचा चाहता अभिनेता वरुण धवन सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचा नवा चित्रपट ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचे शूटींग करत आहे. वरुणने एका चिमुकल्या सोबतचा व्हिडीओ आणि फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वरूण या चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. २) सोशल मीडियावर व्हायरल झालेला अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये जान्हवी मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक चाहता जान्हवीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या कर्मचाऱ्याने या चाहत्याच्या हातावर फटका मारत दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जान्हवीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्या चाहत्याला नाराज न करता, स्वत: चाहत्या जवळ जाऊन आणि सेल्फी काढला. ३) कोरोनाचे लसीकरण सुरू असताना अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी कोरोनाची लस घेतल्याची चर्चा आहे. तेव्हाच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक अशी ओळख असणारे सचिन पिळगावकरा यांनी नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. बीकेसी येथील जम्बो कोरोना सेंटरमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. ४) साऊथ अभिनेत्री समंथा अक्किनेनी आपल्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांचे मन घायाळ करत असते. हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेतच आणि ती त्यावर नेहमी सक्रिय असते. समंथाने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘डोन्ट रश’ चॅलेंजमध्ये भाग घेत हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती चर्चेत आहे. ५) मराठीसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे ही नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांना पाहण्यास मोह पाडते. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू असल्याचे कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. यामुळे ती चर्चेत आहे.