मुक्तपीठ टीम
रोजगाराच्या शोधात असलेल्या आपल्या मराठी तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता एसअँड टी, सुपरवायझर अशा एकूण १२७ जागांसाठी भरती आहे.
ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत त्यांनी अधिकृत पोर्टल mmrda.maharashtra.gov.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२१ आहे.
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक – सहाय्यक व्यवस्थापक पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. यासह ५ वर्षांचा अनुभव असावा. रेल्वे / मेट्रो रेल ट्रॅक, पूल यामध्ये डिप्लोमा केला असावा.
स्टेशन मॅनेजर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
स्टेशन अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, अप्लाइड इलेक्ट्रीक व इतर विभागातील पदवी असावी.
एमएमआरडीए भरती २०२१: हा पगार असेल
सहाय्यक व्यवस्थापक – ५६,१०० – १,७७,५००
स्टेशन व्यवस्थापक – ४१८०० – १३२३००
मुख्य रहदारी नियंत्रक – ४१८०० – १३२३००
वरिष्ठ विभाग अभियंता – ४७६०० – १५११००
विभाग अभियंता – ४१८०० – १३२३०
पर्यवेक्षक – ४१८०० – १३२३००
पाहा व्हिडीओ :