मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० डिसेंबरला मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ८ जागांचा कार्यकाळ संपुष्टात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील २, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर प्रत्येकी १ अशा ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यांच्या जागांवर निवडणूक होणार
१) रामदास कदम, शिवसेना, मुंबई
२)भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
३)सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर
४)अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार
५)गिरिश व्यास, भाजप, नागपूर
६)गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना गोंदिया-भंडारा
दहा डिसेंबरला मतदान
- निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
- त्यानुसार ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे.
- तर या जागांचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होईल.