मुक्तपीठ टीम
ज्यांना प्रवासाची आवड असते, नवीन ठिकाणी फिरण्याची इच्छा असते, तसेच उत्साह असतो, ते कधीच म्हातारे होत नसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याची गोष्ट सांगणार आहोत, जे ज्येष्ठ आहेत. ऐंशीच्या घरातील. मोहनलाल आणि लिलाबाई. मोहनलालना हार्ट अटॅक येऊन गेला आहे. लिलाबाईंचा एकदा पाय मोडलाय. पण दोघेही बुलेटवर बसून भारत फिरत आहेत. दोघांचे साइड कारवाल्या बुलेट बाईकवर बसून ‘शोले’ चित्रपटातील जय – वीरूसारखं भारत भ्रमण सुरु आहे.
२०११ मध्ये लीलाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. आणि या मोहनलालना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना बुलेट न चालवण्याची सूचना दिली होती. पण त्यांचे रस्त्यावर भन्नाट फिरण्याचे प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. त्यांनी त्यांची १९७४ ची मॉडेल बुलेट काढली आणि शहराभोवती फिरण्यास सुरवात केली.
त्यांना मजा तर येत होती पण खरी मजा पत्नी लीलाशिवाय नव्हती. त्या व्हीलचेअरवर होत्या. त्या मागे बसू शकत नव्हत्या. मग त्यांनी विचार केला की जर बुलेटमध्ये एक साइडकार बसवली तर पत्नी त्यांच्यासोबत आरामात प्रवास करू शकेल. तेव्हापासून त्यांनी एकत्र फिरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत दोघांनी तीस हजार किलोमीटरची रपेट एकत्र केलीय…जय विरुसारखीच…कधी भांडत…नेहमी आपुलकीनं…
‘मग त्यांनी एकत्र शार्ट ट्रिप करायला सुरूवात केली. २०१६ मध्ये त्यांनी मोठी ट्रिप केली. यासाठी एफडी मोडावी लागली. त्यांनी महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत प्रवास केला आहे. ते तीन तास बाईक चालवायचे आणि मग जिथं राहायचं होतं तिथे ब्रेक घेत होते.
त्यांची पत्नी लीला त्यांची फायनान्स मॅनेजर होती. रोजचा बजेट ४००० निश्चित केला गेला. लीला यांनी बुलेटमध्ये एक गुप्त तिजोरी केली होती. त्यातून त्या एक रुपयाही अनावश्यकपणे खर्च करू देत नव्हत्या. पत्नीचासोबत सनसेट पाहात कधी ७५ दिवस उलटले त्यांना समजलेच नाही. घरी आल्यावर त्यांनी पुढच्या ट्रिपची योजना सुरू केली आहे.
नॉर्थ ईस्टची दुसरी ट्रिप
त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांनी त्यांची दुसरी ट्रिप नॉर्थ ईस्टची केली. रस्त्यात एका तरुण मुलाने विचारले की काका तुम्ही बरे आहात ना? ते बोलले काका कोणाला बोलला तू? ते जरी वयाने जेष्ठ असले तरी त्यांचा उत्साह आणि मन अजूनही तरुण आहे. मात्र, काही महिन्यांनंतर, प्रवासात त्यांच्या पत्नीचा पाय पुन्हा फ्रक्चर झाला. म्हणून त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु त्या तिथेच थांबल्या नाहीत. त्या साइडकारमध्ये बसल्या आणि म्हणाल्या – चला जाऊया. ते लोकांना सांगतात की त्यांच्या बुलेटमध्ये दोन बॅटरी आहेत, त्यातील एक म्हणजे त्यांची पत्नी लीला.
३०,००० किलोमीटर पूर्ण केले
एकदा ते आणि त्यांची पत्नी जात होते तेव्हा कोणीतरी म्हणाले, ‘जय आणि वीरू आ गए’ तेव्हा त्यांचे मन भरून आले. त्यांची पत्नी लीला नेहमीच त्यांची वीरू असेल, असे ते म्हणाले. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पत्नीबरोबर जगायचे आहे. त्यांच्या समोर फक्त रस्ता, वाऱ्यासोबत केस उडत आणि खाली बुलेट, अशी त्यांची ईच्छा आहे.