Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती: एकनाथ शिंदे

July 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

“सिडको महामंडळातर्फे बांधण्यात आलेली ही घरे आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या किंमतीशी तुलना करता अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. अतिशय उत्तम बांधकाम दर्जा असेलली ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतात. या गृहनिर्माण योजनेस केंद्र सरकारकडून लागू असलेल्या अनुदानाचा भार सिडको महामंडळाने उचलला आहे. 1 जुलैपासून घराचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे, असे एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांनी काढले. सिडको महामंडळाच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपुर्द करण्याच्या समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. या वेळी एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्यात आल्या. सदर कार्यक्रम हा सेक्टर-15, भूखंड क्र. 1 ते 9, पोलीस मुख्यालयामागे, कळंबोली, नवी मुंबई येथे मोजक्या मान्यवरांच्या आणि निवडक अर्जदारांच्या उपस्थितीत व कोरोनाा सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पार पडला.

eknath shinde

या प्रसंगी राजन विचारे, खासदार, ठाणे, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची प्रमुख उपस्थिती तर अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

 

या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोरोनाच्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकाऱ्यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोरोना काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोरोना सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गार काढले.

CIDCO

या प्रसंगी बोलताना डॉ. संजय मुखर्जी यांनी कोरोना महासाथीच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर केलेली मात तसेच अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अर्जदारांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून यशस्वी अर्जदारांना घरांचा ताबा टप्याटप्याने देण्यात येईल असेही ते म्हणाले.

 

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन 2018-19 मध्ये 14,838 घरांची योजना सुरू करण्यात आली. सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये 11 ठिकाणी घरे साकारण्यात आली. 14,838 घरांपैकी 5,262 घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9,576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरे 1 बीएचके (1 हॉल, 1 खोली, 1 स्वयंपाकघर, 2 स्वच्छतागृहे) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. इतका आहे.

CIDCO

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तळोजा येथे 2,862, खारघर येथे 684, कळंबोली येथे 324, घणसोली येथे 528 आणि द्रोणागिरी येथे 864 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे 5,232, खारघर येथे 1,260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 आणि द्रोणागिरी येथे 1,548 घरे उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेतील गृहसंकुलांना भारती शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्याची अभिनव कल्पनाही राबविण्यात आली. सदर योजनेची संगणकीय सोडत 2 ऑक्टोबर 2018 रोजी यशस्वीरीत्या पार पडली.

 


Tags: CIDCOcoronaEknath Shindepanvelunder Pradhan Mantri Awas Yojanaएकनाथ शिंदेप्रधानमंत्री आवास योजनामहागृहनिर्माण योजनासिडको महामंडळ
Previous Post

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशाला आग, सरकारी तिजोरीत महसुलाचा महापूर!

Next Post

कोरोना संकट असतानाही एका वर्षात १४० रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलिंडर!

Next Post
lpg

कोरोना संकट असतानाही एका वर्षात १४० रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलिंडर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!