मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायलयात पोहोचला आहे. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार राज्यात येऊन १ महिना उलटून अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे समर्थक ५० आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शिंदे समर्थक आमदारांना आज प्रिती भोजन!
- शिंदे समर्थक ५० आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
- राज्यातील विकासकामे आणि मंत्रीमंडळाचा विस्तार तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या सर्व मुद्दांवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
- तसेच आमदारांच्या मतदार संघातील विकासकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा मोठा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थक आमदारांसमोर आहे.
- आता याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे आमदारांना माहिती देणार असल्याची चर्चा आहे.
- या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ५० आमदारांची बैठक होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
शिंदेंच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष…
- या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबतही शिंदे आमदारांशी चर्चा करू शकतात.
- तसेच मतदार संघातील रखडलेली विकासकामे देखील उद्याच्या बैठकीत कळीचा मुद्दा ठरू शकतो.
- या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांमधील अस्वस्थता दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करतील.
- त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
- दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले.
- मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे.