Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

दाटीवाटीच्या वस्त्यांमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सुधारित नियमावलीबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात घोषणा

November 27, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
eknath shinde on redevlopment of building

मुक्तपीठ टीम

कठोर नियमावलीमुळे गेली अनेक वर्षे जुन्या ठाण्यासह राज्यभरातील दाटीवाटीच्या वस्तीमधील जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग अखेरीस मोकळा झाला असून सुधारित नियमावलीला मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. या सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार असून अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरणार असल्याने पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी केला.

eknath shinde on redevlopment  of building

नगरविकास विभागाने गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी मुंबई वगळता राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डीसीपीआर – यूडीसीपीआर) लागू केली. या नियमावलीबाबतच्या मार्गदर्शक पुस्तिकांचे (एफएक्यूज आणि इलस्ट्रेटिव्ह मॅन्युअल) प्रकाशन श्री. शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये झाले. राज्याचा नगरविकास विभाग आणि एमसीएचआय क्रेडाई यांच्या संयुक्त वतीने आयोजित या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना एकनाथ शिंदे यांनी दाटीवाटीच्या वस्त्यांमधील जुन्या, तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात असलेले अडथळे दूर करण्यात आल्याची घोषणा केली.

eknath shinde on redevlopment  of building

राज्यभरात बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता यावी आणि शहरांच्या विकासात एकजिनसीपणा यावा, यासाठी नगरविकास विभागाने गेल्या वर्षी एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, अर्थात युनिफाइड डीसीपीआर लागू केला होता. परंतु, काही प्रचलित तरतुदींमुळे जुन्या ठाण्यातील जुन्या अधिकृत इमारती आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींसह राज्यभरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमधील इमारतींचा पुनर्विकास अव्यवहार्य ठरत असल्यामुळे रखडला होता. त्यामुळे या नियमावलीत सुधारणा केल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या सुधारित नियमावलीनुसार सर्वसाधारण पुनर्विकासासाठी मंजूर एफएसआय (१.१) + ०.५ प्रीमिअम एफएसआय + परमिसिबल टीडीआर + ६० टक्के अँसिलरी एफएसआय मिळणार असून धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी मंजूर एफएसआय (१.१) + ०.५ प्रीमिअम एफएसआय + ५० टक्के इन्सेंटिव्ह एफएसआय + परमिसिबल टीडीआर + ६० टक्के अँसिलरी एफएसआय असा वाढीव एफएसआय मिळणार आहे. तसेच, ९ मीटरचा रस्ता १२ मीटरचा गृहित धरून ७० मीटरपर्यंत उंचीच्या बांधकामाला परवानगी मिळणार आहे. त्याचप्रमाणे, ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता असेल आणि महापालिकेने ९ मीटरपर्यंत रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर लगतच्या बांधकामांना ९ मीटर रुंदीप्रमाणे अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार आहेत. पार्किंगबाबतचे नियमही सुटसुटीत करण्यात आले आहेत.

 

यूडीसीपीआरमध्ये स्पेशल बिल्डिंगची मर्यादा ठाण्यासाठी २४ मीटरच्या वर होती, ती २५ मीटर करण्यात आली आहे. तसेच, ठाण्याच्या विकास योजना नकाशात दर्शवलेला G-2 झोन हा शेती विभागात गृहित धरून त्यानुसार परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एक एकरपेक्षा मोठ्या क्षेत्राच्या प्रकल्पात २० टक्के लहान क्षेत्राची बांधून देण्याच्या Inclusive Housingच्या नियमात सदर घरे म्हाडातर्फे लॉटरी पद्धतीने वितरित करण्याचा नियम आहे. परंतु, आता म्हाडाने सहा महिन्यांत या घरांबाबत निर्णय न घेतल्या सदर घरे स्थानिक नियोजन प्राधिकरणास प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतील.

eknath shinde on redevlopment  of building

या सुधारित नियमावलीमुळे पुनर्विकासाचे प्रकल्प व्यवहार्य ठरून जुन्या ठाण्यासह राज्यभरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमधील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. रहिवासी तसेच विकासक या सुधारित नियमावलीचे स्वागत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिका/नगरपालिका हद्दीलगतच्या क्षेत्राचे झोन प्लॅन सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आज प्रकाशित करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकांमुळे बांधकाम विकासकांना जाणवणाऱ्या विविध शंका आणि अडचणींचे निराकरण होईल, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नगरविकास विभागाचे सहसचिव मोरेश्वर शेंडे, संचालक, नगररचना सुधाकर नागनुरे, एमसीएचआय क्रेडाईचे माजी अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक शैलेश पुराणिक, वास्तू विशारद मनोज डेसरीया आणि अनेक बांधकाम व्यावसायिक व वास्तू विशारद उपस्थित होते. या पुस्तिकेची गरज आणि ती तयार करण्यामागची भूमिका गगराणी यांनी उलगडून सांगितली. तर श्री. शेंडे यांनी या नियमावलीतील काही बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. वास्तू विशारद मनोज डेसरिया आणि त्यांच्या टीमने चित्रपुस्तिकेद्वारे नियम कसे सोप्या पद्धतीने कळणार आहेत, ते समजावून सांगितले. हे नियम एवढे सोपे आणि बांधकाम क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार करून तयार केल्याबद्दल श्री. पुराणिक यांनी एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाचे आभार मानले.


Tags: Eknath ShindethaneUDCPRएकनाथ शिंदेठाणेयूडीसीपीआर
Previous Post

राज्यातील २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

Next Post

हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब – डॉ. आशिष देशमुख

Next Post
Ashish deshmukh

हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब - डॉ. आशिष देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!