मुक्तपीठ टीम
भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी ईडीच्या कार्यालयात खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. यावेळी खडसेंसोबत त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र मंदाकिनी यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली आहे, अशी माहिती समोर येत आहे. ईडीनं खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. त्यानंतर खडसे आणि आता त्यांची पत्नी. त्यानंतर आणखी कोण ईडीच्या यादीत असेल , त्याची चर्चा सुरु झाली आहे.
जावयाच्या अटकेनंतर पत्नीलाही ईडीचे समन्स-
- जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आला यावेळी खडसेंची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
- एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते.
- मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे.
- परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
खडसेंची ईडी कार्यालयात ९ तास चौकशी-
- पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी एकनाथ खडसे यांची चौकशी केली.
- खडसे यांनी मात्र हा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ‘ईडी’ कार्यालयात हजर होण्यापूर्वी केला.
- नऊ तास चौकशी ईडीने खडसे यांची नऊ तास चौकशी केली.
- सकाळी ११ च्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात हजर झाले.
- रात्री आठच्या सुमारास ते या कार्यालयातून निघाले.
- चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले.
- त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली.
- यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.
काय म्हणाले एकनाथ खडसेंचे वकील ?
- भोसरी येथील भुखंडखरेदीबाबत खडसे यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
- यावेळी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली.
- चौकशीत आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य केलं.
- ईडीला जी कागदपत्रं हवी होती ती सगळी दिली आहेत.
- ईडीला अजून काही कागदपत्र येत्या १० दिवसांत देणार आहे.
- गरज भासल्यास चौकशीला उपस्थित राहिल असं खडसेंनी इडीला सांगितले असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
चौकशीपूर्वी खडसे काय म्हणाले होते?
- एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत.
- चौकशीला हजर राहण्यापूर्वी खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
- या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय.
- मी पक्ष बदलला.
- भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो.
- त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या.
- राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे.
- नाथाभाऊना कुठून तरी छळावं, नाथाभाऊंना अडकवण्यात यावं असा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
- जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे.
- ज्या अर्थी हे कार्यकार्त्यांच्या ग्रुपवर फिरत आहे म्हणजे हे षडयंत्रच आहे.
- पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.