Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन, एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करा!

August 3, 2021
in सरकारी बातम्या
0
eklavya

मुक्तपीठ टीम

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीय, अनुदानित आणि खाजगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणाऱ्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील नाशिक विभागांतर्गत १७, ठाणे विभागांतर्गत ८, अमरावती विभागात ४ आणि नागपूर विभागांतर्गत १० अशा एकूण ३९ एकलव्य मॉडेल निवासी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी मध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी आणि इयत्ता ७ वी ते ९ वी च्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत विद्यार्थ्याच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रक व विद्यार्थ्याच्या सरल आय डी सह अपलोड करावे, असेही आदिवासी विकास आयुक्त सोनवणे यांनी सांगितले आहे.

 

शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगी, अनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हे आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आणि आदिमकरिता प्रत्येक शाळेत ५ जागा आरक्षित असणार आहेत. ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्रातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मूळ राहिवासचा पत्ता विचारात घेऊन नजिकच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनुसार प्रवेश देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Tags: emrs maharashtraMaharashtrasc studentsआदिवासी विकास विभागएकलव्य मॉडेल निवासी शाळाहिरालाल सोनवणे
Previous Post

बारावीच्या परीक्षेचा निकाल चारनंतर कसा आणि कुठे तपासाल?

Next Post

ओएनजीसी बार्ज बुडाल्याच्या चौकशीसाठी सरकारची उच्च स्तरीय समिती

Next Post
ONGC

ओएनजीसी बार्ज बुडाल्याच्या चौकशीसाठी सरकारची उच्च स्तरीय समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!