Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुरमध्ये युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार!

December 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shailesh Balkawde

कोल्हापुर/ उदयराज वडामकर

जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करुन अंमली पदार्थ विरोधी समितीने यासाठी व्यापक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केल्या.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी समित्यांनी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत, असे सांगून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, सध्या तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा. गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन ते म्हणाले, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांना असणाऱ्या व्यसनाधीनतेविषयीची माहिती घ्यावी.

कोल्हापुर जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोल्हापुर मधील शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते, अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा त्यांनी यावेळी सूचना पोलीस विभागाला केल्या.

व्यापक जनजागृतीवर भर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून बसस्थानक, रेल्वेस्थानक, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या आवारात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येईल.

समुपदेशन केंद्रासाठी प्रयत्न अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या युवक, व्यक्तींना समुपदेशन करुन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री होताना आढळल्यास माहिती द्या

कोल्हापुर जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर 8411849922 व 0231 – 2662333 या क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावी. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.


Previous Post

चीनमध्ये कोरोनाबरोबरच शी जिनपिंगविरोधात असंतोषही फोफावला!

Next Post

राज्य बालहक्क आयोगावर न्याय देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप

Next Post
राज्य बालहक्क आयोगावर न्याय देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप

राज्य बालहक्क आयोगावर न्याय देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!