Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोदी मंत्रिमंडळात शैक्षणिक गुणवत्तेचं प्रमाण वाढलं!

नव्या मंत्र्यांमध्ये अनेक डॉक्टर, वकील, अभियंते, टेक्नोक्रॅट्स

July 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cabinet

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच काही मंत्र्यांना घरीही पाठवले. या मेगाफेरबदलांनंतर मोदी सरकारमध्ये अनेक नवे चेहरे सहभागी झाले आहेत. या नव्या मंत्र्यांमध्ये आठ वकील, चार डॉक्टर, दोन माजी आयएएस अधिकारी आणि चार एमबीए पदवीधारक आणि अनेक अभियंते आहेत.

अश्‍विनी वैष्णव-

  • अश्‍विनी वैष्णव, यांना दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या १९९४ बॅचच्या माजी आयएएस अधिकारी आहेत.
  • ५० वर्षीय राज्यसभेच्या खासदारांनी व्हार्टन स्कूल, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एमबीए आणि आयआयटी कानपूर येथून एमटेक केले आहे.
  • आपल्या कार्यकाळात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत आणि खासकरुन पायाभूत सुविधांमध्ये पीपीपी मॉडेलच्या योगदानासाठी ओळखले जाते.

 

ज्योतिरादित्य शिंदे

  • कॉंग्रेसचे माजी नेते आणि आता भाजपचे राज्यसभेचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांचा खासदार म्हणून पाचवा कार्यकाळ आहे.
  • त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.
  • एकेकाळी हे खातं त्यांचे वडिल माधवराव शिंदे यांनी सांभाळले होते.
  • त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे आणि हार्वर्ड विद्यापीठातून बीए केले आहे.

 

राजीव चंद्रशेखर

  • कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी हार्वर्ड विद्यापीठातील अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रामसह इलिनॉय इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्यूट सायन्स विषयात एमटेक केले आहे.
  • बीपीएल मोबाईल या एकेकाळच्या नावाजलेल्या मोबाइल सेवा कंपनीचे ते सर्वेसर्वा होते.
  • भाजपा समर्थनाच्या टोकाच्या भूमिकेमुळे गेली काही वर्षे चर्चेत आणि वादातही असणाऱ्या रिपब्लिक टीव्ही समुहात त्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.

 

रामचंद्र प्रसाद सिंह

  • रामचंद्र प्रसाद सिंह हे बिहारचे राज्यसभेचे सदस्य आहेत.
  • ते माजी आयएएस अधिकारी आहेत.
  • ते खासदार म्हणून दुसऱ्यांदा कार्यरत आहेत.
  • ते देशाचे नवे स्टील मंत्री झाले आहेत.
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे सिंह हे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रात सेवा बजावली आहे.
  • त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात एमए केले आहे.

 

भगवंत खुबा

  • भगवंत खुबा हे कर्नाटकातील बिदर येथील लोकसभेचे खासदार आहेत.
  • त्यांनी मेकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पदवी घेतली आहे.

 

मोदींच्या मंत्रिमंडळात हृदयरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन आणि सामान्य चिकित्सक देखील आहेत.

सुभाष सरकार-

  • सुभाष सरकार पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील लोकसभेचे खासदार आहेत.
  • ते स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एम्स कल्याणीचे बोर्ड सदस्य आहेत.
  • त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली आहे.

 

भागवत कराड-

  • भागवत किशनराव कराड हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहेत.
  • ते औरंगाबादमध्ये डॉ कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चालवतात.
  • त्यांच्याकडे एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच (बालरोग शस्त्रक्रिया) आणि एफसीपीएस (जनरल सर्जरी) पदवी आहेत.

 

मुंजापारा महेंद्रभाई-

  • गुजरातमधील हृदयरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय प्राध्यापक म्हणून तीन दशकांच्या कारकीर्द आहे.
  • मुंजापारा महेंद्रभाई हे सुरेंद्रनगरचे लोकसभेचे खासदार आहेत.
  • ते जनरल मेडिसिन आणि थेरॅप्यूटिक्समध्ये एमडी आहेत.

 

डॉ. भारती पवार

  • महाराष्ट्रातील दिंडोरी येथून पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत.
  • त्यांनी नाशिकहून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.
  • डॉ. भारती पवार या व्यवसायानं डॉक्टर आहेत.

 

मीनाक्षी लेखी

  • मीनाक्षी लेखी अनेक वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात वकीली करत होत्या.
  • आता त्या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत.

 

मोदी सरकारमध्ये अनेक वकील

  • आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल
  • भाजपा तामिळनाडूचे अध्यक्ष एल मुरुगन
  • बिहार विजयाचे सूत्रधार भूपेंद्र यादव यांनीही एलएलबी केले आहे.
  • प्रथमच नैनीतालचे खासदार झालेले अजय भट्ट
  • खासदार सत्यपालसिंह बघेल
  • भानु प्रतापसिंग वर्मा

या सर्व मंत्र्यांकडेही एलएलबी पदवी आहे.


Tags: doctorsengineerlawyersmodi cabinetअभियंतेटेक्नोक्रॅट्सडॉक्टरमोदी मंत्रिमंडळवकील
Previous Post

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना नेमकं किती महत्व?

Next Post

“बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी”

Next Post
balasaheb patil

"बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!