मुक्तपीठ टीम
सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखिका राणा अयुब यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने राणा अय्युब यांचे १ कोटी ७७ लाख रुपये जप्त केले आहेत. उत्तरप्रदेशात राणा अय्युब यांच्याविरोधात एक तक्रार दाखल झाली होती, त्यामुळे तिथं त्यांची गेल्यावर्षापासून चौकशी सुरू होती. राणा अयुब या भाजपाविरोधी भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. त्यांच्याविरोधातील तक्रार ही हिंदू आयटी सेल या एनजीओने केली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका त्यांच्यामागे ईडीची पीडा लावणारा ठरला की खरंच त्यांनी क्राउंड फडिंगनं लोकांच्या मदतीसाठी मिळालेल्या निधीचा वैयक्तिक खर्चासाठी गैरवापर केला, अशी चर्चा सुरु झाली आहे.
पत्रकार राणा अयुब यांनी मदत कार्याच्या उद्देशाने ऑनलाइन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म केट्टो द्वारे मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला पण कथितरित्या तो निधी स्वतःकडे वळवला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
राणा अयुब यांच्या १ कोटी ७७ लाख रुपयांच्या बँक ठेवी जप्त!
- ईडीची ही कारवाई गेल्या वर्षी उत्तर प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे.
- सार्वजनिक देणगीदारांकडून उभारलेल्या धर्मादाय निधीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने पत्रकार राणा अयुबच्या १कोटी ७७ लाख रुपयांच्या बँक ठेवी जप्त केल्या आहेत.
- हिंदू आयटी सेल नावाच्या एनजीओचे संस्थापक आणि गाझियाबादमधील इंदिरापुरमचे रहिवासी विकास सांकृत्यायन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला.
निधी ज्या उद्देशाने जमवला, त्या उद्देशासाठी वापरला गेला नसल्याचा आरोप!
- ईडीच्या माहितीनुसार, किटोने देणगीदारांना पाठवलेल्या ईमेलनुसार, अयुब यांनी झोपडपट्टीतील रहिवासी आणि शेतकऱ्यांसाठी तीन मोहिमा सुरू केल्या होत्या.
- त्यामध्ये आसाम, बिहार आणि महाराष्ट्रासाठी मदत कार्याचा आणि कोरोनामुळे फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी निधी संकलनाच्या उद्देशाने त्या मोहिमा होत्या.
- त्याच्या चौकशीतून हे स्पष्ट होते की चॅरिटीच्या नावावर निधी पूर्वनियोजित आणि पद्धतशीर पद्धतीने उभा करण्यात आला होता.
- त्या निधीचा वापर ज्या उद्देशाने केला गेला होता त्या हेतूने तो पूर्णपणे वापरला गेला नाही.
- अयुब यांनी स्वतंत्र चालू बँक खाते उघडून काही निधी कथितपणे तिथे वळवल्याचे तपासात आढळून आले आहे.
- राणा अय्युब यांनी किटोवर जमा केलेल्या निधीतून ५० लाख रुपयांची मुदत ठेव देखील तयार केली आणि नंतर ती मदत कार्यासाठी वापरली नाही.
- त्यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडात ७४.५० लाख रुपये जमा केले.
- तक्रारीनुसार, किट्टोने ऑगस्ट २०२१ मध्ये देणगीदारांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते की, ईडीकडून सांगण्यात आले होते की, अय्युब यांनी सुरू केलेल्या तीन मोहिमांमध्ये जमा केलेला निधी जमा केलेला निधी त्या उद्देशासाठी वापरला गेला नाही, ज्या उद्देशाने ते उभे केले गेला होता.
- ते अजूनही संबंधित मोहिमांच्या खात्यात आहेत.