मुक्तपीठ टीम
भलत्याच ‘पॉर्न’तापासाठी गजाआड गेलेल्या राज कुंद्राच्या चौकशीत आता रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात तपासणी करताना पोलिसांना एक रहस्यमय भिंत आणि एक छुपे कपाट सापडले आहे. त्यानंतर या कार्यालयात नव्याने शोधाधोध करण्यात आली. तेव्हा पोलिसांना कपाटात काही बॉक्स आणि कित्येक फाइल्स सापडल्या आहेत ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीशी संबंधित माहिती मिळालेली आहे. तसेच त्याचे येस बँकेप्रमाणेच यूनियन बँक ऑफ आफ्रिकेतही खाते असल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारही झाले असल्याने आता ईडीही कुंद्रांच्या पॉर्नतापांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
कुंद्राचे चार कर्मचारी माफीचे साक्षीदार!
कुंद्राच्या पापाची रोज नवी माहिती पुढे येऊ लागल्याने आता त्याच्या पॉर्न साम्राज्याला घरघर लागली आहे. त्याच्या चार कर्मचार्यांनी त्याच्याविरूद्ध माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्याकडून पोलिसांना कुंद्राचे पॉर्नताप कसे चालायचे हे कळले आहे. त्याच्या रॅकेटची पूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे कुंद्राविरोधात मजबूत पुरावे पोलिसांकडे जमा होत आहेत. त्यामुळे कुंद्रांचा ताप आणखी वाढू शकतो.
भिंतीआड पॉर्नच्या काळ्या पैशाचे रहस्य
- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १ जुलै रोजी कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात छापा टाकला होता.
- त्यावेळी पोलिसांनी कार्यालायची तपासणी केली होती.
- परंतु तेव्हा लपवलेले कपाट सापडले नव्हते.
- वियान इंडस्ट्रीजच्या कर्मचार्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली.
- आतापर्यंत चौकशी दरम्यान राज कुंद्रा यांनीही त्याबद्दल काही सांगितलेले
- शनिवारी एका कर्मचार्याने हे रहस्य पोलिसांना सांगितले.
परदेशी बँकेमध्येही खातं
- राज कुंद्राचा १२१ इरॉटिक व्हिडीओची विक्रीचा सौदा अंतिम टप्प्यात आला होता.
- पॉर्नच्या सौद्यातून कुंद्राला कोट्यवधी रुपये मिळविल्याचे पोलिसांना माहिती मिळाली आहे.
- कुंद्राचे येस बँक आणि युनियन बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यांची तपासणी केली जात आहे.
- या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारही झाले असल्याने आता ईडीही कुंद्रांच्या पॉर्नतापांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
- ईडीला पुरेसे पुरावे आढळले तर कुंद्राविरूद्ध फेमा आणि पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.