मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित मालमत्तेवर ईडीने छापेमारी केली असताना शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. अनिल परब यांच्यासह अंधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. संजय कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. याआधीही त्यांच्या घरी आयकर धाड पडली होती.
संजय कदमांच्या घरीही आयकरनंतर ईडीची धाड
- संजय कदमांच्या अंधेरी पश्चिम येथील निवासस्थानी धाड पजली.
- त्यांच्या अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम, रायगडमध्ये काही मालमत्ता असल्याचं सांगितलं जातं.
- संजय कदम हे केबल व्यावसायिक असून त्यातूनच त्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी जवळीक झाल्याचे सांगितले जाते.
- संजय कदम हे शिवसेनेचे विलेपार्ले पश्चिम, जुहू आणि अंधेरी पश्चिम परिसरातील स्थानिक विभाग संघटक आहेत.
- शाखाप्रमुख पदापासून त्यांचा आजवरचा प्रवास झाला आहे.
- गेल्या काही वर्षांपासून त्यांचं आर्थिक आणि राजकीय बळ झपाट्याने वाढलं.
- सध्या ते अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपा आमदार अमित साटम यांच्याविरोधात आव्हान उभं करत आहेत.
- आर्थिक, संघटनात्मक बळ या जोरावर ते स्थानिक राजकारणात प्रभाव वाढवत असतानाच आयकरमागोमाग ईडीनेही त्यांना लक्य़ केल्याने त्यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.
- त्यांचे विरोधक त्यांच्या महागड्या गाड्या, विलासी जीवनशैलीकडे बोट दाखवतात.