मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी तसेच संबधित ठिकाणी ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. ईडीने सकाळपासूनच छापेमारीला सुरुवात केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या परबांवरील धाडीबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी.”
वांद्रे येथील खासगी निवासस्थान तसेच मरीन ड्राईव्हमधील ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवास्थानासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परबांच्या संबंधित जागांवरही पाहणी केली जात आहे. मनी लाँड्रिग प्रकरणी ही कारवाई केली जात आहे.
अनिल परब यांच्यावरील ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अवैध संपत्तीतून दापोलीतून रिसॉर्ट विकत घेतल्याचा आरोप अनिल परबांवर आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. तसेच पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबांचे नाव समोर आले होते. या दोन्ही प्रकरणांवरून ईडीची ही कारवाई सुरु आहे.
अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी : किरीट सोमय्या
- अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
- अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी.
- ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी.
अनिल परबच का भाजपाचे लक्ष्य?
वाचा:
शिवसेनेचे अनिल परब का झाले लक्ष्य? राजकीय वर्तुळातील चर्चा काय सांगते…
शिवसेनेचे अनिल परब का झाले लक्ष्य? राजकीय वर्तुळातील चर्चा काय सांगते…