रॉबिन डेव्हिडसन / सांगली
सध्या देशाप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रातही पर्यावरण साक्षरत वाढत आहे. प्रदूषण वाढवणाऱ्या पारंपरिक इंधनावरील गाड्यांपेक्षा प्रदूषणमुक्त ई-वाहनांकडे सामान्यांचाही कल वाढतो आहे. सरकारी पातळीवर तर धोरण म्हणून ई-वाहनांवरच भर देण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपुरताच मर्यादित असणारा ई-वाहनांचा वापर आता छोट्या शहरांमधील मनपांकडूनही सुरु होत आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात नुकत्याच २४ ई बाईक दाखल झाल्या आहेत. माझी वसुंधरा आणि रेस टू झिरो अंतर्गत घेण्यात आलेल्या ई बाईक स्वच्छता निरीक्षक वापरणार आहेत.