मुक्तपीठ टीम
इन्फिनिटी ई-स्कूटर बनवणाऱ्या बाऊन्सने आता देशात दर किलोमीटरला एक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन बनवण्याचं लक्ष्य समोर ठेवलंय. त्यासाठी बाऊन्स अनेक मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करत आहे. आता नोब्रोकर.कॉम सोबत नवीन भागीदारी केली आहे. या भागीदारीतून बाऊन्सला भारतातील नोब्रोकर.कॉमच्या १ लाखांहून अधिक स्थळांचा अॅक्सेस मिळणार आहे. ही स्मार्ट आधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणात निवासी इमारतींमध्ये उपलब्ध असेल आणि त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बाऊन्स अॅपवर अगदी जवळच्या स्वॅपिंग स्थानकाचा अॅक्सेस मिळणे सोयीचे ठरेल.
भारतभरात ४,४०० हून अधिक बॅटरी स्वॅपिंग स्थानके उभारण्यासाठी कंपनीने गेल्या आठवड्यात पार्क+, रेडीअसिस्ट, किचेन्स@, हॅलोवर्ल्ड आणि गुडबॉक्स यांसारख्या ब्रँड्स सोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ ही घोषणा करण्यात आली. स्वॅपिंग स्थानके इंधन भरणा म्हणजेच पेट्रोल पंपच्या तत्वानुसारच कार्यरत राहणार आहे. या ठिकाणी बाऊन्स बॅटरी स्वॅपिंग स्थानकांत चार्ज केलेल्या आणि रेडी टू गो अशा तयार बॅटरी उपलब्ध असतील. ग्राहक एका मिनिटात त्यांच्याकडची रिकामी बॅटरी देऊन नवीन बॅटरी सहजपणे स्वॅप करून घेऊ शकतील. जागोजागी, जवळच्या अंतरावर असणाऱ्या या स्थानकांमुळे ग्राहकांना स्कूटर चार्ज करत बसण्याची वाट बघावी लागणार नाही. तसेच बॅटरी चार्ज करायची आहे हे लक्षात ठेवणे, कधी चार्ज करावी लागेल याचा अंदाज घेत बसणे या गोष्टी कराव्या लागणार नाहीत.
अशा महत्वपूर्ण भागीदारी करून ग्राहकांना सोयीचे होण्यासाठी बॅटरी स्वॅपिंग स्थानके एक किलोमीटरच्या अंतराने उभारण्याचे बाऊन्सचे ध्येय आहे. आगामी २४ महिन्यात लाखांहून अधिक स्कूटर्सना पाठबळ देण्यासाठी मजबूत स्वॅपिंग पायाभूत सुविधा उभारण्याचा त्यांचा मानस आहे. https://bounceinfinity.com/swap_station
या भागीदारीबद्दल बोलताना बाऊन्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेकानंद हलाकेरे म्हणाले, “भारतातील लाखोहून अधिक स्कूटर्ससाठी स्वॅपिंग पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल होत असताना नोब्रोकर बरोबर भागीदारी करताना आम्ही खूप भारावून गेलो आहोत. या भागीदारीतून ग्राहकांसाठी सीमलेस स्वॅपिंग अनुभव मिळेल आणि आमच्या उद्दिष्टापर्यंत अधिक वेगाने पोहोचणे आम्हांला शक्य होईल.”
या भागीदारीबद्दल बोलताना नोब्रोकरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित कुमार अगरवाल म्हणाले, “या भागीदारीमुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. यामुळे केवळ पर्यावरण अधिक शाश्वत बनायला मदत होईल एवढेच नाही तर आमच्या नोब्रोकरहूड रहिवासींसाठीही खूप मोठी सोय होईल. नोब्रोकरहूडची पोहोच १ लाख सोसायट्यांपर्यंत गेलेली असल्यामुळे या भागीदारीतून आणखी खोलवर पोहोचता येईल आणि भारतातील इंधन उत्सर्जन कमी व्हायला मदत होईल. नोब्रोकरहूड निवासींना प्रचंड प्रमाणात कमी झालेले ध्वनी आणि वायू प्रदूषण यांचा लाभ होईल.”
बाऊन्सने अलिकडेच बाऊन्स इन्फिनीटी ई-१ ही आपली पहिली ग्राहकाभिमुख इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आणि त्याच अनुषंगाने बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क भारतात उभे करण्याचे ध्येय ठेवले आहे. २ डिसेंबरला सादर करण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ पर्याय उपलब्ध असून भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच घडत आहे. यामुळे पारंपरिक स्कूटर्स च्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत ४०% पर्यंत खाली उतरते. बाऊन्स इन्फिनीटी ई-१ मध्ये उत्तम आणि काढता येणारी बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे घर वा कार्यालयात गाडीतून बॅटरी काढून घेऊन तीचे चार्जिंग करू शकतात. https://bounceinfinity.com/