Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ई संजीवनी’ टेलीमेडिसिनकडून १ कोटी २० लाख सल्ले! दररोज ९० हजार रुग्ण!!

September 23, 2021
in featured, Trending, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
E Sanjeevani

मुक्तपीठ टीम

ई संजीवनी या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने एक कोटी वीस लाख सल्ल्यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तिने देशाची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी टेलीमेडिसिन सेवा म्हणून आकार घेतला आहे. सध्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा देशभरात दररोज ९० हजार रुग्णांना सेवा पुरवत आहे. रुग्ण त्याच बरोबर डॉक्टर आणि तज्ञानी व्यापक रूपाने याचा स्वीकार केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ई संजीवनी ही राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा दोन प्रकारे चालते. ई संजीवनी एबी –एचडब्ल्यूसी अंतर्गत डॉक्टर ते डॉक्टर यामधला टेलीमेडिसिन मंच, आणि ई संजीवनी ओपीडी अंतर्गत रुग्ण ते डॉक्टर यामधला टेलीमेडिसिन मंच अशा स्वरुपात बाह्य रुग्ण सेवा पुरवली जाते. हा मंच रुग्णांना त्यांच्या घरातच सल्ला सेवा पुरवतो.

 

ई-संजीवनीला वाढता प्रतिसाद

  • डॉक्टर ते डॉक्टर टेलीमेडिसिन सेवा देणाऱ्या ई संजीवनीद्वारे सुमारे ६७,००,००० सल्ले देण्यात आले आहेत.
  • आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत आरोग्य आणि वेलनेस केंद्रात याची अंमलबजावणी करण्यात येते.
  • नोव्हेंबर २०१९ मध्ये याची सुरवात झाली.
  • ही सेवा सुरु करणारे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य ठरले होते.
  • ही सेवा सुरू झाल्यापासून विविध राज्यात २००० केंद्रे आणि २८ हजार सल्लागार आहेत.

 

कोरोना आणि बिगर कोरोना रुग्णांनाही सल्ला

ई संजीवनी ओपीडी ही नागरिकांना कोरोना आणि बिगर कोरोना टेली मेडिसिन सेवा पुरवते. देशातल्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा सर्व बाह्य रुग्ण सेवा बंद होत्या त्या काळात १३ एप्रिल २०२० मध्ये याची सुरवात करण्यात आली. या सेवे द्वारे ५१ लाख रुग्णांना सेवा पुरवण्यात आली. ४३० ऑनलाईन ओपीडी द्वारे या सेवा पुरवण्यात आल्या यामध्ये सर्वसाधारण ओपीडी आणि तज्ञ ओपीडी यांचा समावेश होता.

 

पाच एम्समध्येही ई-संजीवनी सेवा

भटिंडा (पंजाब), बीबीनगर (तेलंगणा), कल्याणी (पश्चिम बंगाल), ऋषिकेश (उत्तराखंड), किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज, लखनऊ (उत्तर प्रदेश) इत्यादी एम्स सारख्या प्रमुख तृतीय स्तरीय वैद्यकीय संस्थाही ई संजीवनी ओपीडी द्वारे बाह्यरुग्ण आरोग्य सेवा प्रदान करत आहेत.

 

डिजिटल आरोग्य तफावत दूर करण्यासाठी मदत

केंद्र सरकारची ई संजीवनी- ही राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा शहरी आणि ग्रामीण भारत यामधली डिजिटल आरोग्य तफावत दूर करण्यासाठी मदत करते. द्वितीय आणि तृतीय रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी मदत करण्याबरोबरच डॉक्टर आणि तज्ञ यांच्या संख्येतली कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या धर्तीवर हा डिजिटल उपक्रमही देशातल्या डिजिटल आरोग्य परीसंस्थेला चालना देत आहे. मोहाली इथल्या सी डाक या संस्थेने हे स्वदेशी टेली मेडिसिन तंत्रज्ञान विकसित केले आहे. टेली मेडिसिनची उपयुक्तता आणि कोविद्ची आणखी लाट आल्यास त्यादृष्टीने नियोजन या दृष्टीने या उपक्रमात दिवसाला ५०००,००० सल्ले देण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्रालय यामध्ये मध्ये वृद्धी करत आहे.

 

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaE-Sanjeevaniआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयई-संजीवनीकोरोना
Previous Post

पाकिस्तानात प्रथमच हिंदू महिलेची सनदी सेवेत सहाय्यक आयुक्तपदी निवड!

Next Post

पवन हंस लिमिटेडमध्ये ‘ट्रेनी टेक्निशियन’च्या २८ जागांसाठी भरती

Next Post
pawan hans

पवन हंस लिमिटेडमध्ये ‘ट्रेनी टेक्निशियन’च्या २८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!