मुक्तपीठ टीम
इटलीची सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटी ही नेहमीच आपल्या स्टायलिश बाइक्समुळे चर्चेत असते. आता डुकाटीने त्यांच्या ‘पॅनिगेल व्ही२’ चे स्पेशल अॅनिव्हर्सरी व्हर्जन लाँच केले आहे. त्याची शोरूम किंमत २१.३ लाख रुपये आहे. डुकाटी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “मर्यादित संख्येत सादर केलेली ही बाइक २००१ मध्ये ट्रॉय बेलिसने जिंकलेल्या पहिल्या जागतिक सुपरबाइकच्या डुकाटी ९९६आर वरून प्रेरित आहे. ती पाहताच त्याची आठवण करून देते. लिथियम-आयन बॅटरी आणि एक सीटरमुळे हा नवीन व्हर्जन पॅनिगेल व्ही२ च्या नियमित मॉडेलपेक्षा तीन किलो हलके असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाइकमध्ये ९५५ सीसी ट्विन-सिलेंडर इंजिनची क्षमता आहे.”
ट्रॉय बेलिस यांनी जिंकलेल्या डुकाटी ९९६आरवरून पॅनिगेल व्ही२ची प्रेरणा
- पॅनिगेल व्ही२ स्पेशल एडिशन बाइक ही डुकाटी ९९६आरची आठवण करून देते ज्यावर ट्रॉय बेलिसने पहिले विजेतेपद जिंकले.
- पॅनिगेल व्ही२ वर आधारित, या स्पेशल एडिशन बाइकवर ट्रॉय बेलिसचा विजेता क्रमांक २१ आणि इटलीच्या ध्वजा रंगही वापरण्यात आला आहे.
- हे ट्रॉय बेलिसने वापरलेल्या ९९६आर वरून प्रेरित आहे, ज्यावर बेलिसने २००१ मध्ये पहिले जागतिक विजेतेपद जिंकले.
डुकाटी पॅनिगेल व्ही२ इंजिन स्पेसीफिकेशन
- डुकाटी पॅनिगेल व्ही२ चे इंजिन ९५५ सीसीचे आहे, जे जास्तीत जास्त १५५ बीएचपी पॉवर आणि १०४ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
- ही रेसिंग बाइक मोनोकोक फ्रेमवर आधारित आहे, जी स्पोर्टी डिझाइनने प्रेरित आहे.
- लिथियम-आयन बॅटरीचा अवलंब करून आणि सिंगल-सीटर कॉन्फिगरेशनसह, हे स्पेशल व्हर्जन त्याच्या स्टॅंडर्ड व्हर्जन, पॅनिगेल व्ही२ पेक्षा ३ किलो हलकी आहे.