Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ड्राय क्लीनिंग रोबोट: सोलर पॅनलवरील साचलेली धूळ दूर करणार, सौर ऊर्जा निर्मिती वाढवणार!

October 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
dry cleaning robot

मुक्तपीठ टीम

शहरापासून ते गावापर्यंत लोक विजेच्या बचतीसाठी सौरऊर्जेला पहिले प्राधान्य देत आहेत. सोलर पॅनलसाठी ऊन आणि स्वच्छता हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे. सौरऊर्जा निर्मितीमध्ये पॅनल्सवर साचलेली धूळ अडथळा ठरते आणि सूर्याच्या थेट किरणांच्या अभावामुळे वीजनिर्मिती सुमारे १५ ते २० टक्क्यांनी कमी होते. आयआयटी जोधपूरचे अभियांत्रिकी पदवीधर नीरज कुमार यांनी एक रोबोट डिझाइन केला आहे ज्याद्वारे सौर पॅनल कमी वेळेत आणि पाणी न वापरता चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकेल.

ड्राय क्लीनिंग रोबोटचे फिचर्स आणि हायस्पीड!

  • एका मोठ्या सोलर पॉवर प्लांटमध्ये, एका व्यक्तीला दिवसाला सहा तास म्हणजेच तीन दिवसात १८ तास सोलर पॅनल स्वच्छ करण्यासाठी लागतात.
  • तिथे हा रोबोट तेच काम केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करतो. . सौरऊर्जेचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. हजारो पॅनल बसवून वीजनिर्मिती केली जात आहे, मात्र पॅनल्स धूळमुक्त असतील तेव्हाच त्यांच्या क्षमतेनुसार वीजनिर्मिती होईल.
  • या रोबोटच्या डिझाईनचे २०१७ मध्ये पेटंट घेण्यात आले आहे.

नीरज कुमार यांनी ड्राय क्लीनिंग रोबोटची केली निर्मीती!

  • नीरज कुमार यांनी २०१४मध्ये आयआयटीमधील बीटेक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात रोबोटची रचना केली, ज्याने पुढे जाऊन स्किलेंसर नावाचे स्टार्टअप तयार केले.
  • हा रोबो चालवण्यासाठी वीज कनेक्शन किंवा बॅटरीची गरज नाही. तो स्वतः सूर्याच्या किरणांनी चार्ज होतो.
  • रोबोमधील ब्रिस्टल्स म्हणजेच बारीक आणि सॉफ्ट क्लिनिंग वायर पॅनेलमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रॅक होऊ देत नाही.
  • या रोबोटला अमेरिकास्थित ग्लोबल सेफ्टी सायन्स कंपनीकडून यूएल प्रमाणपत्रही मिळाले आहे.
  • या कंपनीचे नोएडा आणि फरीदाबाद येथे कार्यालये आहेत.

ड्रायक्लीनिंग रोबोटमुळे पाण्याचीही बचत होणार…

  • ड्रायक्लीनिंग रोबोटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करता येऊ शकते.
  • महिन्यातून दोनदा ३ हजार सोलर पॅनल पाण्याने स्वच्छ केले तर एकावेळी सात हजार लीटर पाणी वापरले जाते.
  • आता ही साफसफाई जर रोबोटने केली तर पाण्याची बचत होईल.

रोबोटची निर्मिती करणाऱ्या नीरज कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

  • डिझाईन बनवल्यानंतर २०१८साली रोबोट तयार झाला, पण त्याचे ब्रँडिंग आणि माहिती हे लोकांसमोर मोठे आव्हान होते.
  • अशा परिस्थितीत नीरज यांना त्यांचा मित्र मनीष दासची साथ मिळाली. मनीषही इंजिनीअर आहे.
  • दोघांनी आयआयएम लखनऊ कॅम्पस, नोएडाच्या इनक्यूबेटर सेंटरमध्ये हा प्रकल्प सादर केला.
  • येथे आलेल्या अल्फा वेक्टर कंपनीचे संस्थापक दानू दास यांना हा प्रकल्प खूप आवडला आणि त्यांनी निधीसाठी होकार दिला.
  • २०१९ मध्ये, नीरजने फरीदाबाद येथे आयोजित व्हेंचर कॅटॅलिस्टमध्ये देखील प्रकल्प सादर केला, जिथे ऑटोमोबाईल पार्ट्सचा पुरवठादार इंडो ऑटो टेकचे एसके जैन यांनी त्यात गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली.
  • हे तंत्रज्ञान इतके चांगले आहे की १५ ते २० वर्षे रोबोटचा वापर करता येईल.

क्लाउड डेटावर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संगणक आणि अॅप्सवरून रोबोटच्या कामावर लक्ष ठेवता येते. रोबोट कुठे बसला आहे, तापमान, आर्द्रता, वारा, पाऊस, रोबोटचा वेग, किती पॅनल साफ केले आहेत इत्यादी सर्व माहिती मिळणार आहे.

 


Tags: dry cleaning robotgood newsmuktpeethSolar Panelsolar power generationघडलं-बिघडलंचांगली बातमीड्राय क्लीनिंग रोबोटमुक्तपीठसोलर पॅनलसौर ऊर्जा निर्मिती
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं! सिरीजमार्फत देशाच्या तरूणाईचे मन दूषित केल्याचा आरोप

Next Post

गौरी इंदुलकर लिखित ‘देवाच्या शोधात…’ पुस्तकाचे २० ऑक्टोबर रोजी प्रकाशन

Next Post
देवाच्या शोधात

गौरी इंदुलकर लिखित 'देवाच्या शोधात...' पुस्तकाचे २० ऑक्टोबर रोजी प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!