मुक्तपीठ टीम
क्रूझ पार्टी ड्रग्स प्रकरणात अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान आरोपी असल्याने माध्यमांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत होतीच. त्यात राजकारणाची फोडणी मिळाल्याने ते अधिकच गाजू लागले आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. त्यांना प्रत्युत्तर देत राज्यातील कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक सरकारी प्रमाणपत्र सादर करत वानखेडे आडनाव असलं तरी ते मुसलमान असल्याचं उघड केलं. त्यामुळे प्रकरणाला भलतंच वळण मिळू लागलं आहे.
समीर वानखेडे मागासवर्गीय अधिकारी असल्याने आघात होणार असतील, तर आम्ही सोबत!
“नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू”, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत .नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे.समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
समीर दाऊद वानखेडे! ‘पहचान कौन’ आणि ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ नवाब मालिकांचे ट्वीट्स!
एकीकडे रामदास आठवले जातीचा हवाला देत वानखेडेंसाठी पुढे सरसावले असतानाच नवाब मलिकांनी त्याबद्दलचे वास्तव उघड केले आहे.’पहचान कौन’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. तर ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे. त्यामुळे रिपाई नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात तसे समीर वानखेडे हे अनुसुचित जातीतील नसून मुस्लिम धर्मीय असल्याचे उघड झाले आहे.
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक एनसीबीच्या कारवाईंबद्दल सातत्यानं पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आजवर अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय याबद्दलचे आरोप पत्रकार परिषद घेत केले आहेत. आताही त्यांच्यावतीन सोशल मीडियावर काही बातम्या प्रसारीत करण्यात आल्या आहेत.
आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे प्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. तसेच त्यांचा लग्नाचा फोटोही ट्वीट करत पहेचान कौन? असा प्रश्नही विचारला आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021