जीवन जगण्यासाठी पाणी किती आवश्यक असते हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत. पाण्याचे आपल्या जीवनात महत्वाचे आहे त्यामुळे घरचे असो वा डॉक्टर सतत पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे की, शरीराला स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्यासाठी पाणी उपयुक्त ठरते. पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारापासून मुक्तता मिळते. माणसाच्या शरीरात ६०% पाणी असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, डॉक्टर दररोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर पाहुयात पाणी पिण्याने होणारे फायदे…
पाणी पिण्याचे फायदे
- थकवा कमी करते
शरीरातील २% पाणी जरी कमी झाले तरी शरीरातील तापमान अनियंत्रित होऊ शकते आणि त्यामुळे थकवा येऊ शकते. असे झाल्यास योग्य प्रमाणाच पाणी प्यायल्यास आलेला थकवा दूर होण्यास मदत होते.
- डोक शांत राहते
आपल्या शरीरात जरी केवळ एक ते तीन टक्के पाणी कमी असल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. आपला मूड आणि एकाग्रता कमजोर होते. तसेच डोके दुखते. पाणी प्यायल्यास मेंदू कार्यरत राहतो आणि डोक दुखीही कमी होण्यास मदत होते.
- किडनी स्टोनचा धोका कमी होतो-
द्रवपदार्थांचे अधिकप्रमाणात सेवन केल्यामुळे किडनीमधून लघवी जास्त बाहेर पडते. यामुळे शरीरातील मिनरलचे प्रमाण कमी होते आणि किडनी स्टोनसारख्या धोक्यापासून दूर राहू शकतो.
- वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अन्य द्रव्य पदार्थांशिवाय पाणी प्यायलाने जास्त प्रमाणात कॅलरीज कमी होणास मदत होते. त्यामुळे पाणी पिणे महत्वाचे आहे.