मुक्तपीठ टीम
कोरोना रूग्णांसाठी डीआरडीओच्या नुकत्याच औषध २ डीजीच्या शोधानंतर डीआरडीओने आता एक नवीन आविष्कार केला आहे. डीआरडीओने कोरोना विषाणूवर अँटीबॉडी डिपकोवन किट तयार केले आहे. या किटला ‘डिपकोवन’ असे नाव देण्यात आले आहे. कोरोना विषाणूसह न्यूक्लियोकॅप्सिड (एस अॅन्ड एन) प्रथिने देखील ९७% उच्च संवेदनशील आणि ९९% विशिष्टतेसह शोधली जाऊ शकतात. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीची माहिती मिळणार आहे.
डीआरडीओने व्हॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. हे किट पूर्णपणे स्वदेशी आहे आणि भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. त्यानंतर दिल्लीतील विविध कोरोना रुग्णालयांमधील हजारापेक्षा जास्त रूग्णांच्या नमुन्यांची विस्तृत तपासणी केल्यानंतर त्याची क्षमता तपासली गेली.
Raksha Mantri Shri @rajnathsingh has appreciated the efforts of @DRDO_India and the industry in developing the kit at the time of need. This kit will help the people in their fight against COVID-19 Pandemic. https://t.co/EV4EfndsLW
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) May 21, 2021
गेल्या वर्षात या किटच्या तीन बॅचेसना मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलमध्ये इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने या किटला मान्यता दिली. आता मे महिन्यात त्याच्या उत्पादनास इंडिया ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानेही मान्यता दिली आहे. आता हे किट बाजारात विकले जाऊ शकते. डिपकोवन किट तयार करण्याचा हेतू, मानवी शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा शोधणे आहे. या किटची वैधता १८ महिने असेल. व्हॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडसह डीआरडीओने मिळून हे किट तयार केले आहे.
व्हॅनगार्ड जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचे प्रक्षेपणते लाँच करेल. पहिल्या बॅचमध्ये १०० किट लॉन्च करण्यात येतील. यानंतर, प्रत्येक महिन्यात ५०० किट तयार होतील. या किटची किंमत प्रति चाचणी सुमारे ७५ रुपये असेल. हे किट व्यक्तीला कोरोनाशी लढण्यात मदत करेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतुकही केले आहे.