मुक्तपीठ टीम
डीआरडीओने तयार केलेले २ डीजी औषध हे कोरोनावरील रामबाण औषध असल्याचा दावा केला जात आहे. सोमवारी लॉंचिंग झाल्यानंतर त्याच्याविषयीची महत्वाची माहिती समोर आली आहे. हे औषध तरुणांपासून ते थेट कोणत्याही वयाच्या ज्येष्ठांवरील उपचारासाठी तेवढेच प्रभावी ठरणार आहे.
डीआरडीओचे २ डीजी औषध शरीरातील ज्या पेशींना विषाणूंचा संसर्ग झालेला असतो, त्याच पेशींमध्ये जमा होते. २डीजीमुळे विषाणूंना मिळणारी ऊर्जाच रोखली जाते. ऊर्जा मिळत नसल्यामुळे विषाणूंचा झपाट्याने स्वत:ची प्रतिरुपे म्हणजेच कॉपी तयार करणे शक्य होत नाही. विषाणूंची शरीरातील संसर्ग झपाट्याने वाढणे बंद होते.
हेही वाचा: डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णावर चांगल्या परिमाणांचा दावा!!
त्यामुळे कोरोना रुग्णांना बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागत नाही. तसेच तीन दिवसातच रुग्ण बरे होऊ लागतात. आठवडाभराच्या कालावधीत त्यांच्यापैकी बहुतांश रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असते.
पाहा व्हिडीओ: